देशाचे मूल्यांकन धनसंपत्ती पेक्षा ज्ञान संपत्तीने होते:सुधीरभाऊ मुनगंटीवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

आज दिनांक 21/ 1 /2019 स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना आयोजित महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती व बक्षीस वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे अर्थ नियोजन व वनमंत्री आदरणीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड संजय भाऊ धोटे यांचे भव्य स्वागत स्टुडंट फोरम ग्रुपच्यावतीने करण्यात भरगच्च अशा सभा मंडपात या कार्यक्रमाला ग्रामीण भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी बालक सुधीर मुनगंटीवार यांचे चाहते. आज कोरपना येथे मंत्रिमहोदयांच्या भेटीने चार वर्षापासून आतुरतेने पाहणाऱ्या स्टुडंट फोरम ग्रुपच्या संघटकाचे समाधान मंत्रीमहोदयांनी केले.

या कार्यक्रमाचे उदघाटक माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन ते आमदार धोटे यांचे शाल श्रीफळ देऊन ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आले. तसेच मंचावर प्रमुख उपस्थिती माननीय हरीशजी शर्मा नगराध्यक्ष नगरपरिषद बल्लारपूर तथा भाजपा जिल्हाध्यक्ष, माननीय सतीश धोटे संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष राजुरा, सौ. विजयालक्ष्मी डोहे नगराध्यक्षा नगरपरिषद गडचांदुर, सौ. कांताताई भगत नगराध्यक्षा नगरपंचायत कोरपना, श्री श्रीधरजी गोडे अध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना, श्री. भाऊराव पाटील कारेकर सचिव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपणा, प्राचार्य डॉक्टर वरखड सर, प्राचार्य संजय ठावरी सर, प्राचार्य मेश्राम सर, प्राचार्य राजूरकर सर, प्राचार्य बोबडे सर, इंजिनीयर दिलीप झाडे सर, प्रभारी प्राचार्य खडसे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दिनांक 13 जानेवारी ला स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले, त्यांचे बक्षीस वितरण सत्कार मूर्ती व प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले. ग्रुप तर्फे जीवन गौरव पुरस्कार माननीय अँड धोटे यांना प्रदान करण्यात आला. श्री पराग भिवापुरे, श्री धीरज कोटरंगे, श्री किशोर निकम, श्री विकास गावंडे व योगेश बुचुंडे स्पर्धा परीक्षेत प्रथम पारितोषिक देऊन सत्कारमूर्तींचा सत्कार माननीय मुनगंटीवार व आमदार धोटे यांच्या हातातून करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व प्रोत्साहनपर बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल देरकर उपनिरीक्षक यांनी केले. यावेळी देरकर यांनी गेल्या पाच वर्षापासून अविरत कार्य ग्रामीण भागातील युवकात जातीभेद न करता आर्थिक निकषावर स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन शिबिर उन्हाळ्यात घेतले जाते. आज या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास आठ हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा लाभ घेऊन दोनशे विद्यार्थी विविध प्रशासकीय विभागात कार्यरत आहे. तसेच ग्रुपच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. आज या ठिकाणी 300 ग्रुपचे संघटक कसल्याही फळाची अपेक्षा न करता अविरत कार्य करीत आहेत. मार्गदर्शन व अभ्यासिका उपलब्ध नाही, तरीही आम्ही हे कार्य करीत आहोत. देरकर यांनी प्रस्तावनेत आधुनिक अद्यावत अभ्यासिका देण्याची विनंती, तसेच येथील बेरोजगारासाठी कौशल्य विकास उद्योग, शेतीसाठी माती परीक्षण केंद्र, शेतकरी भवन स्थानिक बेरोजगारांना वाव मिळावा, रुग्णवाहिका या भागातील समस्या प्रस्तावनेत सांगून मार्गी लावण्यात यावी अशी ग्रुपच्या वतीने विनंती केली. माननीय आमदार संजय धोटे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी बोलताना ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुधीर भाऊनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज या भागात दळणवळणाची ग्रामीण भागात मूलभूत सोयीसुविधा चे विकास कामे मोठ्या प्रमाणात झाले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन करतांना या सर्वसामान्य माणसांचा आवाज बुलंद करण्याचे कार्य चार साडेचार वर्षापासून या क्षेत्राचे आमदार संजय धोटेजी करीत असल्याचे बोलले. आज स्टुडंट फोरम ग्रुपच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुला-मुलींना जातीपाती न करता हे देशाची उन्नती हे ज्ञान संपत्तीने होते, हे आदर्श पुढे ठेवून गेल्या पाच वर्षांपासून करीत असल्याचे बोलले. तसेच राज्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या तालुक्यात स्टुडंट फोरम ग्रुप व यांच्या संघटकांनी अहोरात्र मेहनत केली. त्यामुळे धनवाना पेक्षा गुणवांनाना किंमत आहे, हे महान कार्य फोरम ग्रुप करत आहे. त्यामुळे मुनगंटीवार साहेबांनी ग्रुपला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद दिला. याप्रसंगी कोरपना या ठिकाणी अद्यावत आधुनिक अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, शेतकरी भवन माती परीक्षण केंद्र, अत्याधुनिक क्रीडाभवन, रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली. याप्रसंगी तसेच स्टुडंट फोरम ग्रुपच्या विकासाशी मी सदैव तत्पर असल्याचे व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन किशोर निकम यांनी केले. तर आभार प्रफुल मालेकर यांनी केले.