६ डिसेंबरला सिंधुताई सपकाळ कोराडीत

नागपूर/प्रतिनिधी:


महानिर्मितीच्या कोराडी प्रशिक्षण केंद्र, कोराडीद्वारे सुप्रसिद्ध समाज सेविका व अनाथ मुलांची माऊली श्रीमती सिंधुताई सपकाळ, या गुरुवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता "समाजऋण" विषयावर सुसंवाद साधणार आहेत.

सदर कार्यक्रम मारोती मैदान खुले रंगमंच, विद्युत विहार वसाहत, कोराडी येथे आयोजित करण्यात येत असून प्रवेश नि:शुल्क आहे.

सामाजिक जाणीवा जागृत करणारे भावस्पर्शी शब्द व मायेच्या ओलाव्याने ओतप्रोत भरलेल्या सिंधुताईंच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ घेण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे कोराडी प्रशिक्षण केंद्राचे मुख्य अभियंता दिलीप धकाते यांनी कळविले आहे.