सिपीएल क्रिकेट स्पर्धा 23 डिसेंबरपासून

  • विदर्भातील नावाजलेली स्पर्धा पोलीस फुटबॉल मैदानावर 
  • 17 दिवस चालणार 16 संघांमध्ये चुरस



चंद्रपूर: चंद्रपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने आयोजित केली जाते. स्थानिक पोलीस फुटबॉल मैदान तुकुम येथे या स्पर्धेसाठी 4 महिने परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठी 350 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. यानंतर रीतसर लिलाव प्रक्रियेद्वारे प्रत्येकी 16 खेळाडूंचा समावेश असलेल्या 16 चमुंचे गठन केले गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुभवी आणि नवोदित क्रिकेटपटूना या स्पर्धेद्वारे नैपुण्य दाखविण्याची संधी दिली जाते. यंदा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या परवानगीमुळे सुमारे 3 महिने आधी मैदानाच्या मधोमध उत्तम दर्जाची टर्फ खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात उत्तम क्रिकेटसाठी ही सुविधा अत्यावश्यक होती. नुकत्याच पडलेल्या पावसाने सिपीएल स्पर्धेचे पर्व 3 दिवस उशिरा प्रारंभ होत आहे. रविवार 23 डिसेंबर रोजी JCL cup च्या सामन्यांना उत्साही प्रारंभ होत असून उदघाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक आभासचंद्र, सिंग, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जनता करियर लॉन्चरचे प्रमुख प्रा. डॉ. अशोक जीवतोडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. गजानन कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे. गेली काही वर्षे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सिपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून यासाठी मान्यताप्राप्त दर्जाचे पंच, आणि इतर आवश्यक बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. 23 डिसेंबर रोजी पहिला सामना 'चंद्रपूर बुलेट्स' विरुद्ध 'ताडोबा टायगर्स' यांच्यात खेळला जाणार आहे. तर रोज एका दिवशी 2 लीग सामने खेळविले जाणार आहेत. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय तुमराम, रोशन दीक्षित, आरीफ खान, सुनील रेड्डी, अरविंद दीक्षित, नाहीद सिद्दीकी, बालू भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, वसीम शेख , कमल जोरा, हर्षल भगत कार्यरत आहेत. या स्पर्धेला प्रतिसाद देत चंद्रपूरच्या क्रिकेटपटूंचा उत्साह वाढविण्याचे आवाहन लाईफ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.