राष्ट्रीय आदिवासी छात्र संघातर्फे तालुका स्तरीय प्रबोधन कार्यक्रम


चिमूर/रोहित रामटेके
चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथे आज दि.२५/११/२०१८ ला तालुका स्तरीय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघातर्फे करण्यात आला.
आदिवासिंना ७० वर्षात ५ व ६ अनुसूची चा लाभ घेण्यासाठी तसेच आदिवासिंच्या मुलांच्या वस्तीगृहातील डिबीटी(डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर)हि आज वस्तीगृहातील मुलांना मिळत नाहीत यासाठी गंभीर चर्चा करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.विशाल वाकोडे(प्रदेश कार्याध्यक्ष, भारतीय युवा मोर्चा),उद्घाटक मा.प्रा.शैलेंद्र वागधरे, प्रमुख उपस्थिती मा.संदीप कोवे, मा.जयेश मेश्राम,मा.चंद्रकांत गेडाम,मा.वैशाली कंनाके, दिगांबर गोंगले, मा.प्रा.गुणवंत वाघमारे, विठ्ठल येडमे, मा.विकास अंबादे, एकनाथ गोंगले इ. उपस्थित होते.
 तर कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी आदिवासी छात्र संघ,भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच अनेक गावातील लोकांचे सहकार्य लागले