उद्या मुख्यमंत्री चंद्रपूरात मुख्य रस्त्याच्या दुर्दशेला तात्पुरती डॉगडुगी!



उद्या मुख्यमंत्री चंद्रपूरात मुख्य रस्त्याच्या दुर्दशेला तात्पुरती डॉगडुगी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते माजी मुख्यमंत्री मा.सा कन्नमवार यांच्या शतकोतर रौप्य महोत्सव निमित्त दिनांक 10 जानेवारी चंद्रपुरात येत असून दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून रजत तयारी सुरू केली आहे.
चंद्रपूर शहर वासिया वाहतुकीसाठी त्रस्त असलेल्या मुख्य रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून अमृत योजनेच्या पाईपलाईनचे खोदकाम करून ठेवल्या गेले होते. यामुळे अनेक नागरिकांना धुडयुक्त प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र उद्या चंद्रपुरात येणाऱ्या मंत्र्याच्या दौऱ्यामुळे तात्पुरती प्रशासनाकडून डाग डुगी करण्यात आली आहे.
म्हणून चंद्रपुरात रोज मंत्र्यांनी यावी आणि चंद्रपूरातील मुख्य रस्त्यांना गालिछा आच्छादित करून प्रदूषण मुक्त रस्ते करावे अशी चंद्रपूर करांची सदिच्छा!
चंद्रपुरात नागरिक  वाहतुकीच्या रस्त्यावरील समस्याने,  रस्त्यातील  धुडयुक्त प्रदूषणाने  अनेक आजारांना पाठीशी घालत आहेत. मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. 
आणि एक दिवसासाठी का होईना मंत्री महोदय शहरात येतात आणि संपूर्ण शहर झगमगून जातं. एवढेच नव्हे तर फुटपाटवर रस्त्यावर व्यवसाय करणारे रोज रोटी कमवणारे  टपरीवर व्यवसाय करणारे  यांना मात्र एक दिवसाच्या मंत्र्याच्या दौरामुळे आपला  रोजी रोटीचा रोजगार  बंद करून ठेवावे लागते. एकीकडे सरकार सर्वांना रोजगार मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात. दुसरीकडे मंत्र्याच्या दौऱ्यामुळे सुरक्षितता राहावी या दृष्टीने   सगळे फूटपाट वरील व्यवसाय करण्यांना हटवल्या जातात.
 माता महाकालीच्या नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या  भाविकांना  झरपट नदीच्या पात्रात नेहमीच उघड्यावर स्नान करावे लागते. मात्र एक दिवसाच्या दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्याच्या साठी इराई नदीच्या पुलावर दोन्ही साईडने साईडिंग बांधल्या जातात. अशीच परिस्थिती मंत्री असो की  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची  ही व्यवस्था प्रशासनाने नेहमीसाठी केली असती तर, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच चंद्रपूर  शहरातील नागरिकांना   अति आनंदच वाटला असता.  पण असे होत नाही, चंद्रपूर शहर प्रदूषण युक्त असून याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी आता तरी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. नुसते मंत्री येतात म्हणून चंद्रपूर शहराची डागडुगी नको तर ती कायमस्वरूपी सुरळीत रस्ते होण्याची गरज आहे.   चंद्रपूर शहरात   वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून  जटपुरा गेटवरील समस्याचे निराकरण करून  वाहतुकीचा तोडगा काढावा. तरच माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त सत्कोत्तर रोप्य महोत्सवाच्या  निमित्ताने  माननीय मुख्यमंत्र्यांच्या पावन स्पर्शाने चंद्रपूरकरांचे सार्थक होईल....!