पप्पू देशमुखचे चंद्रपूर मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात खड्ड्यात बसून आंदोलन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जनविकास सेनेतर्फे आज ३० जाने रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मनपाने खोदकाम केलेल्या खड्डात सत्याग्रह आंदोलन करण्यात करण्यात आले . मनपाच्या या भोंगळ कारभाराची महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे पप्पू देशमुख कडून आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर मनपा तर्फे भूमिगत गटार योजना व अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी नव्याने पाईप टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . या खोदकामामुळे चंद्रपूर शहर विद्रुपीकरण होत असून नागरिकांना या प्रदूषणाचा फटका त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
काही वर्षांपूर्वी या दोन्हीही योजनेसाठी काही वर्षांपूर्वी शंभर कोटी रुपयांची चंद्रपूर शहरात भूमिगत गटारी योजनेसाठी पाईप टाकण्यात आले होते. पाच ते सहा वर्ष त्या योजनेचे काम चालू होते. दरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. अजून पर्यंत ती पाईपलाईन योजना सुरू झाली नाही. मात्र नवीन 506 कोटीच्या भूमिगत गटारच्या योजनेला महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. पहिल्या गटारी योजनेचे काय झाले? असा प्रश्न जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी चंद्रपूर मनपाला केलाय. त्याचप्रमाणे 334 कोटी रुपयांची पहिली अमृत पाणीपुरवठा योजनेचे अजूनही नागरिकांना पाणी मिळाले नाही आणि दुसऱ्या 236 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे .
मनपाच्या या भोंगळ कारभाराची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करण्याचे 48 तासाच्या आत पत्र द्यावे अशी मागणी देखील जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, सचिन राजूरकर, प्रवीण खोब्रागडे, मनीष बोबडे, अक्षय येरगुडे ,नितीन बनसोड,
यांनी केली आहे.