बल्लारपुरातील अवैद्य धंद्याचा वसुलीबाज कोण ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे पेपर मिल सारख्या मोठ्या उद्योग, कोळसाखानी अशा मोठ्या उद्योगामुळे या शहराची ओळख आहे. मागील काही दिवसापासून या शहरांमध्ये अवैध्य धंद्याने उद्धमाजवला आहे. दिवसा गणित शहरात अवैद्य धंदे चांगलेच फोफावले आहे . सुगंधी तंबाखू, सट्टा, गांजा विक्री, ड्रग्स, कोळशाच्या तस्करी, भंगारवाले , रेतींची तस्करी, असे अवध्य धंदे राजरोसपणे सर्रास सुरू आहेत. हे कुणाच्या आशीर्वादाने हे सांगण्याची सर्वसामान्य जनतेला गरज नाही. कारण या धंद्याची वसुलीच 'गजा' करीत असतो . त्यामुळे या अवैध्य धंद्यावाल्यावर पोलीस प्रशासनाचे वचक राहिले नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैद्य धंद्यामुळे शहराला छोटी-मोठी भाईगिरी ची ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे या शहराची सध्या स्थितीत कायद्या व सुवस्तीचा प्रश्न चांगलाच निर्माण झाला आहे. या तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैद्य व्यवसायिकाच्या चांगलाच जम बसवल्याने. वसुली ही जोमात सुरू आहे. त्यामुळे यांच्यावर पोलीस विभागाचा तर हात नाही ना,! अशा प्रश्नाचा सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. सर्वसामान्यांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडत चालला आहे. हे सगळे अवैद्य धंदे पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू आहेत. शहरात वाहतुकीची व्यवस्था सोडून येथील वाहतूक पोलीस बायपास वर जाऊन आपली कर्तव्य करताना दिसून येतात. यातील अनेक व्यवसायिकांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची आणि राजकीय वरदस्थामुळे पोलीस हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. इथे रुजू झालेल्या नवीन पोलीस निरीक्षकांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्यांनाही खिळ कुठेतरी बसली. या अवैध्य व्यवसायिकांना पोलीस निरीक्षकानी आळा घालून कायदा व सुव्यवस्था कायम राखतील आणि वसुलीबाज हा 'गजा' कोण? याचा शोध घ्यावा !