...त्या मोबाईल व्हॅन मध्ये वरोरा आरोग्य विभागात घडलं तरी काय ?
.. ती घटना सत्य की असत्य ? वरोरा शहरात होतोय चर्चा !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (वरोरा) :-
वरोरा उपजिल्हा रुग्णालय येते राष्ट्रीय स्वयं रोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शंभर दिवस क्षयरोग मोहिमेची यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात जवळपास दोन लाखाच्या वर संशयित क्षय रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे. तशी माहिती झालेल्या कार्यक्रमातून देण्यात आली. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना उपक्रमात जोखीमयुक्त गटातील लोकसंख्या व संशयीत क्ष रुग्ण याची तपासणी बाबत NAAT तपासणी व क्ष- किरण तपासणी करण्यात आली. जवळपास अंदाजे सूत्राच्या माहितीनुसार दोनशे नागरिकांची तपासणी करण्यात आली.
मात्र या कार्यक्रमात क्ष- किरण प्राथमिक प्रात्यक्षिक करण्यासाठी आणलेल्या एका मुलीला मोबाईल व्हॅन मध्ये तेथील टेक्निशियन कडून पूर्ण कपडे उतरवून क्ष- किरण( एक्स-रे ) काढण्यात आल्याची चर्चा सध्या चांगलीच पसरली असून ही चर्चा आता आरोग्य विभागातही सुरू आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता. ते म्हणाले की, या कार्यक्रमाची त्या प्रकरणाचा काही संबंध नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार एक्स-रे काढण्यासाठी मोबाईल व्हॅन मध्ये असा प्रकार घडल्याची माहिती आली. त्यानुसार वरोरा ए डी पी ओ, आमच्या विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशी करिता सांगितले आहे. चौकशी केली असता एक्स-रे काढताना त्या मुलीच्या ड्रेस डिफॉल्ट होता. तो काढताना फाटला. असे चौकशीत निष्पन्न झाले असून. संबंधित मुलीकडे तो बघितला नाही. वॉल कडे बघत होता. अशी माहिती चौकशी अंती त्या मुलीने दिली असून कुठलीही तक्रार त्या मुली परिवाराकडून दिली नाही. ते त्या मानसिकतेत नाहीत असे त्यांनी सांगितले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.पटले यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता. म्हणाले की, असं काही झाले नाही, परंतु या संदर्भात जिल्हा परिषद च्या सिओ कडून आम्हाला चौकशीसाठी आदेश आले आहेत. तशी चर्चा कानावर आली आहे. त्या मुलीचे एक्स-रे केले. परंतु कपडे काढले नाही, तिथे आशा वर्कर उपस्थित होत्या असे त्यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी, मात्र या प्रकरणात कुठेतरी माशी शिंकल्या जात असल्याची चर्चा सध्या होत आहे.
एकंदरीत या प्रकरणात एक्स-रे काढत असताना त्या टेक्नीशियन जवळ कुठलीही आशा वर्कर, परिचारिका उपस्थित नव्हती, एखाद्या महिलेचे एक्स-रे करीत असताना पुरुषाच्या सोबतीला एखादी महिला असायला हवी ! खरंच त्या टेक्निशियनने मुलीचे कपडे काढले काय? ती मुलगी ओरडत बाहेर आली का? त्या ठिकाणी कुठलीही आशा वर्कर उपस्थित का नव्हती ?अशी माहिती सूत्राकडून समोर येत आहे.
हे प्रकरण अधिका-याकडून दाबण्याचा प्रयत्न होत तर नाही ना अशी शंका नागरिकांना उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील घटनेत सत्य की असत्य? याचा शोध घेण्याची गरज आहे! मात्र या कार्यक्रमात आणलेल्या मोबाईल व्हॅन मधिल घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.!