पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर मोठा घोळ, हजारो विद्यार्थ्यांचा संताप
आजची परिक्षा पुढे ढकलली...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीची परीक्षा वादाच्या भोवऱ्यात
बैंक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीच्या परीक्षेत मोठा घोळ झाला असून परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीचे पोर्टल चं हॅक करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे, जर आपण A वर क्लीक केलं तर शेवटी ते B वर जाईल किंव्हा चुकीच्या ऑप्शन मध्ये जाईल अशी सेटिंग केली गेली असल्याने मनसेने या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा नोकर भरती घोटाळा असल्याची तक्रार केली होती त्याला बळ मिळतं आहे. दरम्यान चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद जालना नांदेड गोंदिया भंडारा येथे परीक्षा केंद्र ठेवल्यानंतर आता जो परीक्षेत घोळ झाला असल्याने व ही परीक्षा दोन दिवसांनी होईल असे सांगण्यात आल्याने दोन दिवस बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा खर्च कोण देईल हा प्रश्न करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने परीक्ष घेणाऱ्या बैंक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे, यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे व इतर पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर मोठा घोळ झाला.
हजारो विद्यार्थीनी रोष व्यक्त केला. बाहेरील जिल्ह्यातील परिक्षेसाठी येणाऱ्याना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला.
हि परिक्षा उद्या होणार असे सांगितले जाते? पण! विद्यार्थ्यांना विश्वास बसत नाही...!
मागील काही महिन्यापासून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेची नोकर भरती चुकीच्या पद्धतीने व नियमाला डावलून होतं आहे व मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचे आरक्षण संपवून खुल्या प्रवर्गात नोकर भरती घेतल्या जात आहे त्यामुळे ही नोकर भरती रद्द करा व आरक्षणाच्या माध्यमातून नोकर भरती घ्या अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी शासन प्रशासनाकडे करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याबाबत याचिका केली होती त्यावर काल दिनांक 20 डिसेंबरला सुनावणी झाली असून बैंकेला नोटीस पाठविण्यात आली आहे, दरम्यान आज दिनांक 21 डिसेंबरला बैंक भरतीचा पहिल्या दिवशीची परीक्षा वादात सापडली असून एक A वर टिक केली तर ते B वर लीक होण्याच्या घटना चंद्रपूर नागपूर यासाह राज्याच्या सर्वच सेंटरवर घडत असल्याचे व्हिडीओ व्हायरलं होतं असल्याने ही परीक्षा रद्द करून दोषी बैंक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीच्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे अन्यथा मनसे कडून सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी प्रशासनाला दिला आहे.