रितेश राजुरकर यांचे दुःखद निधन

दु:खत घटना


रितेश राजुरकर यांचे दुःखद निधन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर नाभिक समाजातील प्रतिष्ठित, समाजाप्रती अभिरुची असणारे
स्व/ रितेश गजानन राजूरकर यांचे
29 /12/2024 दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे अचानक निघून जाणे समाजाचीच नव्हे तर ते ज्या क्षेत्रात काम करत होते क्षेत्रातील अनेक स्वव्रदयी अशा आप्त सखीयांचे फार मोठे नुकसान झाले. त्यांच्या जाण्याची पोकळी ही न भरून निघणारी असून सदैव स्मरणात राहणारी ही व्यक्ती आज आपल्या सर्वांना सोडून निघून गेली. त्याचे दुःख समाजाला तर फार मोठे असून त्यांच्या मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, आणि राजुरकर परिवार असून त्यांना सांभाळण्याची ईश्वर शक्ती देवो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!हीच भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी दहा वाजता शांतीधाम येथे होत आहे.