..त्या काँग्रेस उमेदवाराच्या पार्टीत झालेल्या गजानन च्या मृत्यूची चौकशी करून प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा - अतुल वानकर
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
होणा-या विधानसभा निवडणुकीत मतदारांना लुभावण्यासाठी उमेदवारांकडून मटण चिकन पार्ट्याचे आयोजन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विविध उमेदवार करत असून अशाच एका उमेदवारांच्या प्रचारार्थ ठेवलेल्या मटण पार्टीत दोन कार्यकर्त्यांचा विहिरीत तोल जाऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल दिनांक 10/11/2024 च्या रात्री 9.00 च्या दरम्यान दुःखद घटना घडली.
गजानन काळे व त्याचा मेव्हणा अरुण महल्ले असे विहिरीत पडलेले दोन व्यक्ती होते.
त्या घटनेत माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे यांचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या परिवारातील सदस्यांना हा मृत्यू नसून घातपाताची शक्यता वर्तवली आहे.
असा आरोप आज घेण्यात आलेल्या श्रमिक पत्रकार परिषदेतून वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे अपक्ष उमेदवार अतुल वानकर, दीपक मते, ऋषिकेश खंगार, यांनी केला आहे.
काँग्रेसचे समर्थक प्रमोद मगरे यांच्या गिट्टी क्रेशर वर झालेल्या घटनेने तर्कवितर्क लावल्या जात आहे. ही घटना की घातपात, यावर संशय निर्माण होत असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ मटन पार्टी आयोजित केली होती. त्यामुळे या पार्टीतील खर्च हा उमेदवाराच्या निवडणुकीची खर्चात समावेश करावा. निवडणूक भरारी पथकाने या संदर्भातील चौकशी करून कारवाई करावी. तसा अहवाल इलेक्शन कमिशनला कळवावा. काँग्रेस पार्टीचे उमेदवार दोषी असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. मृत्यू पावलेल्या गजानन काळे यांच्या परिवाराला आर्थिक मदत आयोजकाकडून करण्यात यावी. या घटनेची विस्तृत चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी.
गजाननला पत्नी, आई-वडील नसून एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. गजानन हा काँग्रेस पक्षाची निगडित असून अशा प्रकारचा दुर्दैवी अंत होणे, यावर परिसरात शंका कुशंका निर्माण होत असून या घटनेची सविस्तर चौकशी करावी. यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब, उप पोलीस विभागीय अधिकारी वरोरा, उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय वरोरा, तहसीलदार बरोरा यांना या संदर्भाची निवेदन दिले आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतील दिली असून. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची योग्य चौकशी केल्यास खरे सत्य बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.