भाऊ हट्टा पायी ताईचे लोटांगण, परिवार वाद उफाळला ! काँग्रेसची सीट धोक्यात?



भाऊ हट्टा पायी ताईचे लोटांगण, परिवार वाद उफाळला ! काँग्रेसची सीट धोक्यात?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :(वरोरा)
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभेतील निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एकाच परिवारातील राजकीय नेत्यांचे अस्तित्व प्राण पणाला लागले आहेत.
काँग्रेसचे दिवंगत नेते खासदार बाळू धानोरकर यांचे ज्येष्ठ बंधू अनिल धानोरकर यांना काँग्रेसनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी वंचित चा झेंडा हाती घेतला आहे.
त्याच ठिकाणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने परिवारातच परिवार वाद उफाळून आला आहे.
अनिल धानोरकर यांनी स्पष्ट म्हटले आहे की, भाऊ हट्टा पायी खासदार धानोरकर यांनी लोटांगण घातले आहे. त्या हट्ट्या पायी त्यांनी परिवार वाद समोर आणला असून. कुठलेही राजकीय अनुभव नसताना फक्त आणि फक्त भाऊ प्रेमापोटी त्यांनी काँग्रेसची तिकीट प्रविण काकडे ला दिली. यापूर्वी सुद्धा प्रतिभाताईला तिकीट देताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले होते की, माझी मोठी चूक झाली मी तिकीट देऊन आमदार बनवून चूक केली. कारण आता जनसामान्यातही खासदार कुणाचे फोन उचलत नाही. साधी कार्यकर्त्यासोबत चर्चा सुद्धा करत नाहीत. अशी ओरड या परिसरात होत आहे. म्हणून जनतेच्या भावना घेऊन मी या परिवारातला म्हणून निवडणूकीत उभा राहिलो आहे. भद्रावती नगरपालिकेत विकासाचे काम घेऊन ते पूर्णत्वास नेले असल्याने या परिसरातील जनता जनार्दन माझ्या मागे खंबीरपणे उभी असून ते मला नक्कीच निवडून देतील अशी भावना अनिल धानोरकरांनी व्यक्त केली.
राजकारणामुळे परिवारात फूट पडली. सर्व प्रॉपर्टी आपल्या नावाने करून घेतल्या असा गंभीर आरोपही अनिल धानोरकरांनी केले. कारण प्रविण काकडे यांचे वागणे बरोबर नसून, सकाळपासूनच 90 च्या शोधात असल्याने अशा उमेदवाराला जनता नक्कीच धडा शिकवेल. समाजात अशी एक म्हण आहे' गर्वाचे घर लवकरच खाली होतात' ते या 'मी 'पणात खासदारांचे दिसून येत आहे. कदाचित हे खासदारकींची शेवटची ही निवडणूक  असू शकते !अशी जनतेत चर्चा आहे.
 अनिल धानोरकरांना वरोरा विधानसभेची  वंचित   उमेदवारी मिळाल्यानंतर  येथील काँग्रेस ला तगडे आव्हान असून  अनिल यांच्या रूपाने भरदस्त उमेदवार वंचितला मिळाला असून त्यांचा दांडगा संपर्क आणि भद्रावती पालिकेत फार मोठे विकासाचे कामे अनेक वर्षापासून मुरब्बी राजकारणी याचा फायदा अनिल  धानोरकरांना होऊ शकतो. परंतु तेवढेच खरे आहेत की, या क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार  करण देवतळे ,  आणि अपक्ष असलेले डॉक्टर  चेतन कुठेमाटे  यांचा ग्रामीण भागात दांडगा संपर्क पाहता  त्यांची ही चुरस वाढली आहे.आणि पूर्वी मनसेकडून  तिसऱ्या नंबर वर राहिलेले रमेश राजुरकर यांचे तगडे आव्हानही असणार आहे. त्यामुळे  वरोरा विधानसभेत काँग्रेसचे वर्चस्व सोडता एकंदरीत इथे कोण बाजी मारेल हे मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.