चंद्रपूर परिमंडळात संविधान
स्तंभाचे उद्घाटन व भारतीय संविधानाचे वाचन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांचे हस्ते आज दिनांक 26/11/2024 ला भारताचे संविधान स्तंभाचे चंद्रपूर परिमंडळात भारताचे संविधान स्तंभाचे उद्घाटन व भारतीय संविधानाचे वाचन महावितरण विद्युत भवन परिसरात उद्घाटन झाले व भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले तसेच अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ कार्यालया तर्फे संविधान पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे,अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, चंद्रपूर मंडळ,अधीक्षक अभियंता श्री. रमेश सानप (पा.आ.) यांनी भारतीय संविधानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र वांदिले (प्रशासन), चंद्रशेखर दारव्हेकर, सत्यदेव पेगलपट्टी, विकास शहाडे (प्रशासन), शीतलकुमार घुमे (स्थापत्य), सहा. महाव्यवस्थापक (मा. सं.) प्रभारी श्री. सुशील विखार, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरिवार, उपविधी अधिकारी शैलेंद्र फुले, व सर्व अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.