आमदार किशोर जोरगेवारांची दहा वर्षानंतर घर वापसी !




आमदार किशोर जोरगेवारांची दहा वर्षानंतर घर वापसी !

या नेत्यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शेकडो कार्यकर्तासह भारतीय जनता पक्षात दुपारी एक वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माझी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकार याव यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा त्यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार यावं यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक विधानसभेत जिंकण्याच्या दृष्टीने पूर्ण शक्तीने प्रयत्न करीत आहेत. दृष्टिकोनातून चंद्रपुरातील ही जागा भाजपच्या खात्यात यावं या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठींनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यानी भारतीय जनता पक्षात पुन्हा दहा वर्षांनी घर वापसी करून घेत उमेदवारी देण्यात आली.
त्यासोबतच काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा राहिलेल्या नम्रताताई ठेमस्कर यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळाल्याचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज पक्षप्रवेशा दरम्यान सांगितले.
त्यांचाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांचंही पक्षामध्ये स्वागत करतो आणि. प्रवेश केल्यानंतर कामाच्या जबाबदारीचे वितरण निश्चितपणे होईल.
जिल्ह्याच्या जनतेने नेहमीच भारतीय जनता पार्टीचा व महायुतीचा आपला आशीर्वाद दिला लोकसभेचा एक परिणाम सोडला तर आजपर्यंत भाजप
पार्टीच्या कामावर जनतेने विश्वास व्यक्त केला.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांते प्रयत्नाची पराकाष्टा करत सहाही जागावर  भाजपचे उमेदवार निवडून येतील.
 भाजपा हा एक पारिवारिक पक्ष आहे. या परिवारात दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत आहे.  भाजपात वरिष्ठ नेत्यांचे आदेश असेल तर त्या आदेशान बरोबर त्या आदेशाने काम करायचे ही पक्षाची विशेषता आहे. असे म्हणत आतापर्यंत दिल्ली मुंबई दरबारी झालेल्या  घडामोडी, घटनेला बगल देण्याचे प्रयत्न  मुनगंटीवाराकडून करण्यात आले. आणि जे झाले ते विसरा  आता जिल्ह्यातील  सहाही विधानसभेतील महायुतीचे उमेदवार निवडून येतील  असा विश्वास संपादन केला.