मनपाच्या मल निसारन केंद्राच्या पाईपलाईनचे खोदकाम करताना कामगाराचा मृत्यू


मनपाच्या मल निसारन केंद्राच्या पाईपलाईनचे खोदकाम करताना कामगाराचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटदाराकडून पठाण पुऱ्या बाहेर मल निस्तारण केंद्राच्या पाईपलाईनचे काम सुरू आहेत. त्या पाईप लाईन खोदकामात भिवापूर मातानगर वार्ड तालुक्यातील कामगार पवन वद्धनेलवार वय 26 वर्ष हा काम करत असताना त्याच्या अंगावर मातीचे ढिगाडे पडल्यामुळे तो खड्ड्यात डिगाळ्याखाली दबून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे त्याचा आज मृत्यू झाला.
चंद्रपूर शहरातील निघणाऱ्या गढूळ पाण्याचे WTP (प्युरोफाय ) करण्याचे काम पुणे- मुंबईकडील कंत्राटदारांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्याचे कंत्राट काही पेटी कंट्रॅक्टवर चंद्रपुरातील कंत्राटदार करीत आहेत.
ते काम करीत असताना कामगारांना सुविधा न पुरवता त्यांच्याकडून असुरक्षेचे काम करून घेतल्या जात आहे. त्यामुळे आज नाहक एका गरीब कामगाराचा मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहेत. त्यात काही सामाजिक, राजकीय लोकांनी मदती करून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी करून दिल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता,त्याचे मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले असून. अजून पर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्याची माहिती दिली. संबंधित प्रकरणातील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.
चंद्रपूर शहराच्या पठाण गेटच्या बाहेर मल निसारण केंद्राचे wtp प्लांट तयार होत असून शहरातील निघणारे गढूळ पाणी त्याचे निसारण करून ते पाणी सिटीपीएस ला पाठवण्याचा मनपा प्रशासनाचा हा उपक्रम आहे. त्या ठिकाणी कंत्राटदार मार्फत काम सुरू असून. आज पवन नावाच्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.