आर टी ओ तत्परतेने 30 शाळकरी विध्यार्थी सुखरूप घरी परतले
मध्य धुंद स्कूल बस चालकावर परिवहन विभागाची कडक कार्यवाही
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- मध्यधुंद अवस्थेत बेशिस्त रित्या स्कूल बस चालकावर परिवहन विभागाने कडक कार्यवाही करून चालकाला पोलिसांच्या हवाले करण्याची घटना चंद्रपुरातील घुगूस येथे घडली.
प्राप्त माहिती नुसार नायगाव येथील विद्यार्थी घुगूस च्या प्रथमेश कॉन्व्हेन्ट शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळकरी मुलं शाळेत जाण्यासाठी आणि परत जाण्यासाठी MH 35 K 3936 ता बस चा उपयोग करतात. काल दुपारी बस शाळेतील मुलांना नायगाव ला सोडण्यासाठी जात असताना स्कूल बस चालक वाहन बेशिस्त रित्या चालवत असल्याचे परिवहन विभागाचे सहायक मोटर निरीक्षक कमलेश खाडे यांच्या निदर्शनास आले.त्यांनी लगेच त्या स्कूल बसचा पाठलाग सुरू केला.वाहन चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले असता त्यानी वाहन पुन्हा वेगाने घेऊन गेला.अखेर फिल्मी स्टाईलने परिवहन विभागाच्या निरीक्षकाने वाहन थांबविले.वाहन चालकाची परिस्थिती बघता चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी ,मोरे,सहायक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्या सूचनेनुसारआर टी ओ सहायक मोटर निरीक्षक खाडे यांनी वाहन चालकावर रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला,तसेच वाहन परिवहन कार्यालयात जप्त करण्यात आले.
मद्यधुंद चालक असलेल्या स्कूल बसची परिवहन विभागाने तपासणी केली असता वाहनात 30 विद्यार्थी बसून असल्याचे निदर्शनास आले. त्यात परीचालका सुद्धा नसल्याचे , तसेच या स्कूल बस चे सर्व कागद पत्र laps झाल्याचे दिसले.सहायक मोटर वाहन निरीक्षक खाडे यांनी दाखवलेल्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली असल्याचे दिसून येते.
परिवहन विभागाने दाखवली माणुसकी
मद्यधुंद चालक असलेल्या स्कूल बस मध्ये 30 विद्यार्थी असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले.परिवहन विभागाच्या आर टी ओ सहायक मोटर वाहन निरीक्षक खाडे,वाहन चालक गजानन टाले,वाहन चालक विलास गभने, यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी,मोरे यांच्या सुचने नुसार परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः बस चालवत सर्व विद्यार्थ्यांना नायगाव येथे त्यांच्या घरी सुखरूप सोडण्यात आले.परिवहन विभागाने केलेल्या कार्याचे नायगाव येथील नागरिकांनी कौतुक केले आहे.