काँग्रेस व भाजपाच्या घरभेदी राजकारणात कोणाचा बळी ? हौशा- गौशानी बांधले आमदारकीचे बाशिंग ?



काँग्रेस व भाजपाच्या घरभेदी राजकारणात कोणाचा बळी ?
हौशा- गौशानी बांधले आमदारकीचे बाशिंग ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी राजकीय पक्षांनी पक्ष चाचपणी सुरू केली आहे. यात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावे म्हणून जवळपास 22 उमेदवारी अर्ज पक्षाकडे प्राप्त झाल्याची चर्चा आहे. तर भाजप पक्षाकडून अर्ज जरी प्राप्त झाले नसले तरी काही नाव चर्चिले आहेत. भाजपच्या या कार्यकर्त्यांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल म्हणून कार्यकर्त्यांचे दावे करणे सुरू केले आहेत. यात कुणाचा बळी जाईल हे सांगता येत नाही! यापूर्वी प्रभाकर पटकोटवार, किशोर जोरगेवार यांचाही बळी गेला. आता ब्रिजभूषण पाझारे यांचाही बळी जाणार की काय? असा कयास जनता लावत आहे. पण काही झाले तरी, ब्रिज भूषण पाझारे हे 'आता नाही तर कधी नाही' असे म्हणून यावेळेस निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याच्या आशीर्वादाने अनेकांना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. तेही सध्या वोडिंगबाजी, बॅनरबाजीत तल्लीन झाले आहेत. ऐनवेळी भाजप कोणाच्या गळ्यात माळ घालेल. हे सांगता येत नसले तरी, चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांची भाजपकडून वर्णी लागू शकते? असे भाकीत वर्तवल्या जात आहे.
काँग्रेसकडून हौशा - गौशानी दावेदारी केली आहे.
यात खास करून मागील विधानसभेत बल्लारपूर विधानसभेतून निवडणूक लढणारे राजू झोडे यांना काँग्रेस कडून चंद्रपूर विधानसभेची उमेदवारीचा गाजर दाखवून राजकीय बळी घेतला जाऊ शकतो? राजू झोडेच्या राजकीय आकलन शक्तीचे चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन्ही मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक संघटनेत राहून कुठेच दाळ गळली नाही . उलगुलान संघटना स्थापन केली . ते सोडून स्वतः काँग्रेस पक्षात प्रवेश करून चंद्रपूर विधानसभेची सीट मिळावे म्हणून दावेदारी ठोकली आहे. या मतदारसंघात झोडे यांचे व्यक्तीश: कोणतेही संघटन नाही. पक्षाच्या भरोशावर राहून बाजी मारणे अवघड आहे.
हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गातील राखीव असल्याने अनेकांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. परंतु काँग्रेस व भाजपाच्या घरभेदी राजकारणात ऐनवेळी कोणाचा बळी जाईल. कुणाला बळीचा बकरा बनवला जाईल! तत्पूर्वी तयारी करण्याचे सर्वांनाच लालीपाप राजकीय पक्षाकडून मिळाले आहेत. यासाठी पूर्वी पोलीस निरीक्षक असलेले सुधाकर अंभोरे, डॉ. दिलीप कांबळे, प्रवीण पडवेकर, बाळूभाऊ खोब्रागडे, राजू झोडे, दोन वेळा आपटून पडलेले महेश मेंढे आणि हौश्या- गौशा असा अनेक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसकडे अर्ज केले आहेत.
येणाऱ्या विधानसभेसाठी आमदारकीचे बाशिंग बांधून तयार असलेले. काही घोषित तर काही अघोषित उमेदवारीत कुणाचा बळी जातो. हे मात्र येणाऱ्या काळातच कळेल! सच्चा आणि निष्ठावण कार्यकर्त्यांचा नेहमीच हिरमोड होत असल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीतून दिसून आले. शेवटी जनतेला अखेर मानावे लागेल 'जून ते सोन'! तूर्तास एवढेच!....