पहिल्याच दिवशी 'वंदे भारत एक्सप्रेस खाली धावली! ' प्रवास्यांचा प्रतिसाद नगण्य ! काय आहेत कारण?



पहिल्याच दिवशी 'वंदे भारत एक्सप्रेस खाली धावली!

प्रवास्यांचा प्रतिसाद नगण्य ! काय आहेत कारण?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशाच्या आर्थिक विकासात रेल्वेचे अनन्यसाधारण असलेले महत्व व राष्ट्रीय एकतेचे प्रतिक असलेल्या रेल्वेच्या विकासाला खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीपासून मोठी चालना मिळाली आहे.
भारतीय रेल्वेचा नवा आयाम प्राप्त करून देण्यात मोदी सरकारचे मोठे योगदान. देशभरातील सहा वंदे भारत गाड्यांना हिरवी झेंडी दाखवल्या.
नागपूर ते हैदराबाद प्रवास करणाऱ्या नागरिकांना नवी सेवा देतानाच पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी वर्गाचेही हित जपले. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात दोन थांबे मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे लावून धरली. त्याचाच परिणाम म्हणून अतिजलद असलेल्या या अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्स्प्रेसला चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुंडम, काजीपेठ आणि त्यानंतर शेवटी सिकंदराबाद असे मोजकेच थांबे या गाडीला आहेत.
अथक प्रयत्नामुळे  सेवाग्राम व चंद्रपूर येथे थांबा देण्यात आणि जिल्ह्याला दक्षिण भारताची जोडण्याचा प्रयत्न करण्यात यश प्राप्त करणारे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार.
 आज प्रथमच ही  वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते सिकंदराबाद, आणि सिकंदराबाद ते नागपूर  धावली . मात्र आज दोन्ही टायमाच्या प्रवासामध्ये मोजके 50 च्या आत मध्ये   मोजक्या प्रवासाने प्रवास केल्याने संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेस खाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवासांचा प्रतिसाद नगण्य दिसून आला. संपूर्ण गाडी खाली धावली.
 एकतर प्रवासांना या एक्सप्रेस बाबत माहिती नसावी. किंवा या  एक्सप्रेसची टिकीट जास्त असल्यामुळे   प्रवाशांनी पाठ  फिरवण्याचे कारण असू शकतात.  
 हि एक्सप्रेस  वीस  डब्याची असल्याने  फार मोठा भुदंड आज रेल्वे प्रशासनावर पडला असून, खर्चही  परवडणारा  नसून  त्यात अंदाजे 80 च्या वर कर्मचारी सेवेसाठी कार्यरत आहेत.एकंदरीत बोगीचे डब्बे कमी करून,  प्रवाशांना  काही प्रमाणात तिकिटात सूट मिळाल्यास या एक्सप्रेसचा चांगलाच फायदा होईल असे भाकीत आज पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्या काही प्रवासांनी आपले मनोगत व्यक्त केले.  तसे पाहता वंदे भारत एक्सप्रेस प्रवासासाठी लाभदायक, आरामदायक, वेळेचे परिपूर्ण  सदउपयोग घेऊन चालणारी  गाडी ठरणार आहे.
 मात्र प्रवास्यांच्या म्हणण्यानुसार थोड्या  सवलती प्राप्त झाल्यास या प्रवासात अधिक आनंद द्विगुणीत होण्याचे  प्रवाशांनी  मत व्यक्त केले.