जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीचा विस्फोट ! वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून वाढत्या गुन्हेगारीचा विस्फोट होताना दिसून येत आहे. या गुन्हेगारीला साथ देणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची मूक सहमती आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. सूत्राच्या माहितीनुसार चंद्रपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उचल बांगडी होण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार वरिष्ठ स्तरावरून चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची चौकशी सुरू आहे. चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा यासाठी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चांगल्या अधिकाऱ्यांची वरणी लागावी अशी चंद्रपूरकरांची इच्छा आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर पोलिसांची कामगिरी शून्याकडे चालली आहे. गुन्हेगारी रोखण्यास जिल्ह्यातील पोलीस विभाग अक्षरशः फेल झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सूत्राच्या माहितीनुसार हे सत्र थांबणारे नसून, चंद्रपूर मोठ्या एका कुख्यात गुंडाच्या खून झाल्यानंतर गुन्हेगारांनी या संदर्भाची बैठक घेऊन, गुन्हेगारीला पुन्हा पुनर्च्छा जीवित करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला करीत हत्या केली. यात मुख्य आरोपी समीर शेख यांच्यासह 6 आरोपींना अटक करण्यात आली. हा जुन्या वादातून खून करण्यात आला.
हाजी ची हत्या केल्यावर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले, पोलिसांनी आरोपिकडून 4 देशी बनावटीची बंदूक व चाकू जप्त केला.
पोलीस विभागातील काही निवडक अधिकाऱ्याच्या मुखसंमतीने गुन्हेगारी प्रवृत्तीत खाकी वर्दीवर वचक राहिले नाही का? कारण मागील 40 दिवसात अनेक ठिकाणी बाम्ब हल्ले, गोळीबार, बंदुकीसाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या असे साहित्य मिळाल्यानंतरही पोलिसांनी अशा घटनाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पोलिसांचे गुन्हेगारीवर वर्चस्व राहिले की नाही ! की ,खाकी वर्दीचा वचक संपला असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. पोलिसांनी आणि राजकीय वरदस्त गुन्हेगारीवर निर्माण झाले तर! जिल्ह्यातच काय संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे काम पोलीस विभागाकडून होऊ शकते! पण कुंपण शेत खात असेल तर! रखवाली करणार कोण?
विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची ९ चंद्रपूर जिल्ह्यात वर्णी लागताच 2 ते 3 महिने जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णतः बंद होते, पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात अशी सुरुवात केली होती की ,जिल्ह्यातील संपूर्ण क्राईम, आणि अवेद्य धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे सुरुवात केले होते.
मात्र त्यानंतर सर्व अवैध धंदे पुन्हा सुरू झाले, सुगंधित तंबाखू तस्करी, अवैध कोळसा, सट्टा, देशी बंदुक व काडतुसे चा व्यापार अश्या अनेक अवैध धंद्याना उत का बरं आला? हा मोठा प्रश्न आहे.
चंद्रपूर पोलीस दररोज रात्री पेट्रोलिंग करायची, रात्री कुणी फिरताना दिसलं की पोलीस त्याला त्याचे नाव, नंबर कुठून आला, कुठे जात आहे? याबाबत शहानिशा करायची, रात्रीचे 10.30 वाजले की पोलिसांचे वाहन दुकानदाराला दुकान लवकर बंद करा असे निर्देश द्यायचे.
अनेजजन रात्री बेरात्री शहरात बिनधास्त फिरत असतात, कुणीही त्यांना थांबवित नाही, रेती तस्कर, भंगार चोर, तंबाखू तस्करी, दारू तस्करी, डृगस महाविद्यालयात नशाच
वाढत प्रमाण,
अशा अनेक गुन्हेगार, शहरात असे काही ठिकाण आहे जे मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू असतात, त्याठिकाणी काही कुख्यात गुन्हेगार आपले ठाण मांडून बसून असतात. यांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अक्षरशा फेल झाल्याचे चित्र महाराष्ट्रातच दिसून येत आहे.