येरखेडा येथे नाल्यांचे दूषित पाणी रस्त्यावर, घाणीचे साम्राज्य, रोगराईची समस्या !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत येरखेडा येथील ग्रामपंचायत च्या दुर्लक्षितपणामुळे गावात महामारी, रोगराईची समस्या निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातील नाल्या पावसापूर्वी साफसफाई न केल्याने पावसाचे पाण्यासह गावातील नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे सर्वीकडे घाण पसरली असून रस्त्यावर चिखल सुद्धा झाले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
वार्ड नंबर एक तसेच वार्ड नंबर चार मध्ये मुख्य चौकातच ही दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. या परिस्थितीला कारणीभूत ग्रामपंचायत सचिव, सरपंच आणि वारंवार पंचायत समितीला या संदर्भाची तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष करणे यामुळे पंचायत समिती सुद्धा जबाबदार आहे. रस्त्यावर सांडपाणी जमा झाल्यामुळे दुर्गंधी, रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. नाल्यातील घाण पाणी वापरीत असलेल्या विहिरीत जात असल्याने आणि तेथील पाण्याचे उपयोग गावकरी करीत असल्याने विविध आजारांची समस्या निर्माण होऊ शकते. अशी तक्रार गावातील नागरिक अतूल चिंचुलकर यांनी गट विकास अधिकारी चिमूर पंचायत समिती यांना देण्यात आली आहे.