स्थानिक आमदाराचा 'या' पक्षात होणार प्रवेश ?



स्थानिक आमदाराचा 'या' पक्षात होणार प्रवेश ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा या आठवड्यात ? मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचे निश्चित झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
मागील काही दिवसापासून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचे शिवसेना शिंदे गट, की, भारतीय जनता पार्टी, प्रवेश होण्याची चर्चा सुरू होती. मात्र सूत्राच्या माहितीनुसार मुंबई येथे या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्याचे बहुमतादिक्यात निवडून आलेले. राज्यातील एकमेव अपक्ष आमदार यांची भाजप पक्षात वर्णी लागणार असल्याचे खलबले सुरू झाले आहेत.
किशोर जोरगेवार हे मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते,  त्यांना भारतीय जनता पक्षाकडून 2014 ला तिकीट न मिळाल्याने  त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून  धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती.  हार पत्करावी लागली होती. नंतर 2019 मध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी,  काही इतर पक्षाकडूनही  तिकिटे साठी धावपळ  सुरू होती.   शेवटच्या क्षणापर्यंत  कुठल्यातरी पक्षाचे तिकीट मिळेल  या आशेवर असताना शेवटपर्यंत कुठल्याही पक्षाची तिकीट न मिळाल्याने अखेर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आणि त्या निवडणुकीत चंद्रपूरलाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला बहात्तर हजाराच्या  लीडने अपक्ष  उमेदवार म्हणून निवडून आले. त्यामुळे येथे भाजपाला चांगलाच धसका बसला.  
निवडणुकीत अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी  जाहीरनाम्यात अनेक आश्वासनाची  फुलमाला करून जनतेकडून सहानुभूतीपूर्वक विजय संपादन केले!
त्यांनी स्वतःच  'यंग चांदा ब्रिगेड' नावाची  संस्था स्थापन करून  आपल्याक्षेत्रात अनेक  संघटनात्मक बांधण्या केल्या. त्याचाही  त्यांना  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत  फायदा होईल . असे असताना  भाजप प्रवेश म्हणजे  पुन्हा एकदा लॉटरी लागण्यासारखे ! कारण प्रतिस्पर्धी राजकीय  पक्षांकडे  सामाजिक आणि राजकीय चेहरा  नसल्याने त्याचाही फायदा होऊ शकतो? पण यापूर्वी जनतेला दिलेल्या काही आश्वासनाची पूर्तता झाली. तर  काही न झाल्याने  चंद्रपूरकरांना अजूनही त्या 200 युनिटची आठवण होत आहे.
सध्या चंद्रपुरातील पूरक वातावरण, आणि इतर पक्षाचे उमेदवार पाहता, किशोर जोरगेवार  यांच्याविरोधात सध्या तरी इतर पक्षात  तगडा उमेदवार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या उमेदवारीसाठी जातीय राजकारणाचे समीकरण, विशिष्ट प्रवर्गासाठी असलेल्या राखीव जागेसाठी उमेदवारी असल्याने  इतर पक्षांना उमेदवार शोधणे  मोठे आव्हान आहे. सध्या तरी पाहता किशोरभाऊचा जनसंपर्क
. ग्रामीण भागात  दांडगा असला तरी, यावेळेस अपक्ष म्हणून  निवडून येणे  कठीण असल्याचे  जनतेत चर्चिला जात आहे?. म्हणून योग्य वेळी, आणि जनतेच्या  जनाधार राखून  किशोरभाऊनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश?  करीत असल्याचे  बोलले जात आहे!
असाही तर्कवितर्क लावला जात आहे की,  यंग चांदा ब्रिगेड  चे संघटनात्मक धोरण आणि भारतीय जनता पार्टीच्या  मूळ मतदानाची संख्या पाहता  किशोर भाऊंना अजूनही   फायदा होत असल्याने 'आशा पल्लवीत' करून  'घर वापसी'  करून घेत आहेत ?