.. येथे डॉक्टरांनाच उपचारासाठी जावं लागते खाजगी रुग्णालयात ! शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांचे बेहाल !



... येथे डॉक्टरांनाच उपचारासाठी जावं लागते खाजगी रुग्णालयात ! शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांचे बेहाल !

बारामती व चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय एकाच वेळेस, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची उदासीनता !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथे 2014 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी करण्याचे काम मागील दहा वर्षापासून सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या रुग्णालयात चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि शेजारील तेलंगणा राज्यातील हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी चंद्रपुरात येत असतात. मात्र येथील गलिच्छ व दूषित वातावरणामुळे रुग्णालयातीलच पाच निवासी डॉक्टरांना डेंगूची लागण झाली. डेंगू ची लागण झाल्यानंतर येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावं लागते यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील दुर्भाग्याची गोष्ट काय? असे प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डेंगूची लागण झालेल्या निवासी डॉक्टरांना येथील डीन याने साधी विचारपूसही केली नसल्याचे बोलले जात आहे.
बारामती व चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय एकाच वेळेस मंजूर झाले असताना सुद्धा तेथील वैद्यकीय रुग्णालय सुसज्जपणे उभे आहे. मात्र चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत अजूनही वाकुल्या दाखवत आहे. चंद्रपूर जिल्ह्याला अर्थमंत्री पद मिळण्यात आता काय 'अर्थ' राहिला असा प्रश्न आता जनतेकडून केला जात आहे. दहा वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण न होणे हे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्याचे अपयश आहेत. आता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन संजीवनी देण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
पप्पू देशमुख यांनी बारामती वैद्यकीय विद्यालयाला भेट संपूर्ण माहिती घेऊन संवाद साधून. त्याच धर्तीवर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली असता रुग्णालय, प्रयोगशाळा अशा महत्वपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हायला किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, घनश्याम येरगुडे, मनीषा बोबडे, स्नेहा कवठाळे, सुभाष पाच भाई, गोलू दखणे, अमोल रामटेके, राहुल दडमल, कविता अवतलकर, देवराव हटवार , रसद शेख यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय निवासी वस्तूगृहात 83 डॉक्टर असून त्या ठिकाणी वस्तीगृहाच्या छतावरील पाण्याच्या टाक्या कुजलेल्या असून पाण्याच्या टाकीत पाल पडलेला असतात. परिसर अस्वच्छता असून अशा ठिकाणी निवासी डॉक्टर राहत असून त्यामुळेच येथील डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एवढेच नाही तर मागील दहा वर्षापासून रामनगर मध्ये स्त्री रुग्णालयाची स्वतंत्र इमारत उभी आहे. परंतु प्रशासन या इमारतीचा ताबा सोडायला तयार नाही. जिल्हा शल्य चिकित्सकांनी ताबा सोडण्याबाबत आजपर्यंत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही स्त्री रुग्णालय सुरू झाले नाही.
यामुळे अनेक महिला एकाच बेडवर दोन दोन महिलांना ठेवल्या जात आहे. अशा अनेक समस्याचे माहेरघर आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पहावयास मिळतात. जर या समस्यावर तोडगा काढण्यात आला नाही तर लवकरच जन विकास सेनेकडून मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इसाराही पत्रकार परिषदेतून देण्यात आला.