पुन्हा चिमूरच्या आमदाराची चंद्रपूरात बॅनरबाजी, वरिष्ठ नेत्याचा बॅनरवर फोटो नसल्याने चर्चेला उदान !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- १८/७/२०२४
चंद्रपुरात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या उद्या होत असलेल्या वाढदिवसानिमित्त शहरभर होर्डिंग लावण्यात आले आहे.
चंद्रपूर शहराच्या मुख्य चौका चौकात आमदार बंटी भांगडीया यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. फलकावर चंद्रपुरातील निवडक चार नेत्यांना सोडले तर कोणत्याही चंद्रपुरातील वरिष्ठ नेत्यांचाफोटो बॅनरवर नसल्याने चंद्रपुरात चर्चेला उदान आले आहे.
लावलेल्या त्या बॅनरवर चंद्रपूर जिल्ह्याचे माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री, ओबीसी महा. अध्यक्ष हंसराज अहिर, डॉ. अशोक जीवतोडे, आणि माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार,आणि काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देवुन आले प्रकाश देवतळे या चार नेत्यांचे या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त बॅनरवर फोटो झळकले आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ नेता, सामान्य जनतेचे ह्रदय सम्राट, विकास पुरुष, दूरदृष्टी असणारे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बॅनर वर फोटो नसल्याने भाजप कार्यकर्त्यात नाराजी दिसून येत आहे. याची माशी कुठेतरी शिंकत आहे .यामुळे चंद्रपूर शहरात आता चांगली चर्चा सुरू झाली आहे.
शहरात लागलेल्या या बॅनर मुळे या आमदाराची चंद्रपुरात नवीन राजकीय खेेळी खेळली तर जात नाही ना? नाही तर मग, ही दिवाळखोरी आपला मतदार संघात सोडून चंद्रपुरात कशासाठी असा प्रश्न चंद्रपूर करांना चांगलाच भेडसावत आहे. चिमूरच्या आमदाराची एन्ट्री चंद्रपुरात होणे म्हणजे शहरातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बॅनर वर फोटो न घेणे म्हणजे वारंवार डिवचने होय काय? असा सुर चंद्रपूर शहरात सुरू झाला आहे. कारण या आमदारासोबत चंद्रपुरातील वरिष्ठ नेत्यासोबत कधीही जुळवा जुळवी झालेली नाही अशी चर्चाही आहे. मग एवढी बॅनरबाजी शहरात कशासाठी? कुठेही बॅनर लावण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण हेतू पुरस्कार आपल्याच पक्षातील एखाद्या वरिष्ठ नेत्याचा फोटो बॅनर वर न लावणे म्हणजेच, यातून जनतेला काय संदेश द्यायचा असतो. हे सामान्य माणसाला किंवा कार्यकर्त्याला सांगण्याची...!
यावरून उघड उघड सत्य होते की, दोन राजकीय नेत्यांचे आपआपसात पक्षांतर्गत सोडले तर हितसंबंध कसे असतील हे आता सांगण्याची...!
मागील वर्षीही आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसाचे बॅनर चंद्रपूर शहरात लागले होते. त्या बॅनर वरही फक्त दोन नेत्याच्या शुभेच्छा जाहिरातीमुळे चांगलीच जिल्ह्यात चर्चा रंगली होती.
पुन्हा तीच पूर्णावृत्ती करून या आमदाराने मात्र बॅनरबाजीच्या माध्यमातून प्रसिद्धी करून घेत आपल्याच पक्षात एक राजकीय रंग उधळला आहे.