सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचा सर्वात पहिला मान युवा प्रतिष्ठान बीड , चंद्रपूर नाभिक समाजाची उपस्थिती



सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचा सर्वात पहिला मान युवा प्रतिष्ठान बीड , चंद्रपूर नाभिक समाजाची उपस्थिती

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यासाठी सुधीर मुनगंटीवार युवा प्रतिष्ठान बीड येथील मुंबई कार्यालयातील स्वी श्री सहाय्यक योगेश भागवत यांनी चंद्रपूर येथील नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन नागपूर चंद्रपूर फुलांची व्यवस्था करून चंद्रपुरात कधी नव्हे असे भव्य दिव्य 14 फूट पुष्पहाराला जेसीबीच्या साह्याने सुधीरभाऊ च्या स्वागतासाठी तयार केले.
मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बत 14 फुटांचा पुष्पहार तयार करण्यात आला होता. क्रेनच्या मदतीने हार मुनगंटीवार यांना घालण्यात आला. आगळेवेगळे काम करणारा नेता म्हणून मुनगंटीवार यांचे नावलौकिक आहे. नेता असा म्हटल्यावर कार्यकर्ताही आगळेवेगळे काम करणारच ना! हा हार घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव योगेश भागवत असे आहे. भागवत बीडहून चंद्रपूरला आले होते. त्यांनी चंद्रपूर यवतमाळ येथील नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य घेऊन हा भव्य दिव्य हार बनवून चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. योगेश भागवत हे नाभिक समाजाचे असल्याने चंद्रपूर येथील नाभिक समाजातील कार्यकर्त्यांना घेऊन सर्वप्रथम सुधीरभाऊ चा सत्कार करण्याचा मान हा नाभिक समाजाला मिळाल्याने नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुभेच्छा देण्यासाठी चंद्रपूर येथील नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर, रवींद्र येसेकर,संदेश चल्लीरवार, श्याम राजूरकर, संतोष अतकरे, रमेश हनुमंते, जामुवंत निंबाळकर, यवतमाळ जिल्ह्याचे  महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे, निखिल मांडवकर, विनोद धाबेकर, प्रज्वल नागतुरे निकश कडुकर, विठ्ठल हनंमते, महागावकर, यासोबत नाभिक समाजातील  पदाधिकारी यांची उपस्थिती होती.