चंद्रपुरात 41 वर्ष अविरत योगदान देणारे राजीव गांधी अभियांत्रिक संशोधन आणि तंत्रज्ञान महाविद्यालय




चंद्रपुरात 41 वर्ष अविरत योगदान देणारे राजीव गांधी अभियांत्रिक संशोधन आणि तंत्रज्ञान महाविद्यालय

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन आणि तंत्रज्ञान महावि‌द्यालय, चंद्रपूर या महावि‌द्यालयाची स्थापना सन १९८३ ला चंद्रपूरातील अग्रगण्य मान्यवरांच्या पुढाकाराने करण्यात आली. तेंव्हा पासून, महाविद्यालयाने गुणवत्ता, नवकल्पना आणि उत्कृष्टतेसाठी आपली ओळख निर्माण केली आहे. प्रारंभीच्या काळात, केवळ ठराविक शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण दिले जात होते. परंतु, वाढत्या मागणीमुळे आणि वि‌द्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेच्या शोधामुळे, आज महाविद्यालयात सात शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण दिले जात आहे. यामध्ये Computer Science & Engineering, Data Science, Mining Engineering, Electronics & Communication Engineering, Civil Engineering, Mechanical Engineering, Electrical Engineering या विद्याशाखांचा समावेश आहे.
महावि‌द्यालयाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात यश मिळवले आहे. विविध शिक्षणक्षेत्रात सहयोग करुन, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचे शिक्षण आणि संशोधनाची संधी मिळवून दिली आहे.
चंद्रपुर इंजीनियरिंग कॉलेज (CEC) म्हणून नावलौकिक असलेल्या महाविद्यालयाचे नामान्तरण होऊन राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन आणि तंत्रज्ञान महावि‌द्यालय, चंद्रपूर हे नाव महावि‌द्यालयाला देण्यात आले. तंत्रशिक्षण क्षेत्रात ४१ वर्षे अविरत योगदान देणारे प्रतिष्ठित महावि‌द्यालय असा राजीव गांधी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाचा लौकिक आहे. प्रथम पदवी धारक तुकडी १९८७ ला यशस्वी होऊन बाहेर पडली असून २०२४ पर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी होऊन जगभरात विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत.
समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण आपल्या चंद्रपुर शहरात मिळावे है धोरण समोर ठेऊन आपले महाविद्यालय उभारण्यात आले. आज पर्यन्त महाविद्‌यालयाने अनेक चढउतार बघत दिवसेंदिवस प्रगति साधत महावि‌द्यालय उच्चस्तरावर पोहचले आहे. महावि‌द्यालया प्रती असलेल्या शिक्षकांचे योगदान विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीसाठी महत्वाचे ठरते, महावि‌द्यालयाद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यातील ऋणानुबंध स्पष्ट होतो. गेल्या ४१ वर्षांमध्ये, महावि‌द्यालयाने हजारो अभियंत्यांना तयार केले आहे, ज्यांनी जगभरात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महावि‌द्यालयातील अ‌द्यावत प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, आणि आधुनिक शिक्षण पद्धतींमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाचा अनुभव मिळतो.

याव्यतिरिक्त सामाजिक भान जपण्याकरिता व समाजाला काही देने या उदात्त हेतूने महिला सबलीकरण निमित्त जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो, आश्रम शाळेमधे विद्यार्थासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलि जाते, तसेच शैक्षणिक साहित्य, दैनंदिन वापराच्या भेटवस्तू देण्यात येतात, वृद्धाश्रम येथे असणाऱ्या वृद्धासाठी दैनंदिन वापराच्या भेटवस्तू देण्यात येतात, तसेच Run for Unity, स्वच्छता अभियान, मतदार जागृती अभियान, इत्यादि विविध सामाजिक उपक्रम महावि‌द्यालयातर्फे राबविल्या जातात.
सत्र २०२३-२४ चा वार्षिक आढावा घेत असता महाविद्यालयाने खूप मोठी झेप घेतली आहे, महावि‌द्यालयातील विविध कार्यक्रमासहित विद्यार्थ्यांनी नवनवीन कुशल तत्वे अंगीकृत करीत स्वतःला तयार केले आहे. त्याचाच भाग म्हणून ठिकठिकाणी होत असलेल्या स्पर्धेमधे विजय मिळवून महावि‌द्यालयाचे नाव उंचावत आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ मधे

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध अशा नामांकित कंपनीमधे उदा TCS, Vedanta, L&T, HSBC, Tata, Bajaj, Lloyd Metals, Dalmia, Radiant ई.. येथे यश प्राप्त करुण एकूण २९५ विद्यार्थ्यांचे यशस्वीपणे प्लेसमेंट झालेले आहे, व त्यातील उच्च पॅकेज १६ लाख प्रति वर्ष इतके आहे. तसेच NPTEL परिक्षेमधे उच्च कामगिरी करताना विद्यार्थ्यांनी परीक्षा यशस्वी केलि तसेच पियूष व्यास या विद्यार्थ्याने सदर परीक्षेत देशातुन पहिला क्रमांक पटकाविला आहे

महावि‌द्यालयाचे उद्दिष्ट नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व संसाधने उपलब्ध करणे हे आहे. आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो की, आमचे महाविद्यालय भविष्याच्या नवीन शक्यता आणि संधींच्या शोधात अविरत प्रयत्नशील आहे. आमचा वारसा, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेच्या परंपरेने प्रेरित असून, आम्ही नेहमीच पुढे जाण्याचा ध्यास घेतला आहे.
या महावि‌द्यालयाच्या आजपर्यंतच्या वाटचालीबाबत आपण अवगत आहात व या महावि‌द्यालयाप्रती आपला नेहमी स्नेहभाव राहिलेला आहे व यापुढेही तो असाच कायम राहील ही खात्री आहे व आपण या बाबत जनसामान्यास अवगत करावे अशी अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे, कॉलेजचे सचिव विनोद दत्तात्रेय, यांनी दिली यावेळी सर्व शाखेचे प्राध्यापक शाखाप्रमुख, यांची उपस्थिती होती.