डॉ. तोडासेकडे अतिरिक्त पदभार नियमबाह्य ,जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांचे तात्पुरते आदेश





डॉ. तोडासेकडे अतिरिक्त पदभार नियमबाह्य ,जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांचे तात्पुरते आदेश !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील साडेचार वर्षांपासून डॉक्टर हेमचंद कन्नाके हे वर्ग दोन गट अ वैद्यकीय अधिकारी म्हणून क्षय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात
वैद्यकीय अधिकारी म्हणून असे अनेक प्रभार त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. अशा प्रकारचे माध्यमातून एकाच अधिकाऱ्याकडे अनेक प्रकार अजब अधिकाऱ्याची गजब कहानी ! अशा मथळ्याखाली वर्तमानपत्रात बातमी दिल्यानंतर डॉक्टर कन्नाके यांची पुन्हा परत क्षय रुग्णालयात वापसी झाल्याचे पत्र नागपूर विभागाच्या उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांच्या आदेशान्वयेचे पत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात धडकल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.



डॉ. तोडासे यांच्या नियुक्तीचे आदेश उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर विभागाकडून नसताना दोन ठिकाणी पदभार कसे?

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या डॉक्टर शितल तोडासे त्यांच्याकडे सध्या चंद्रपूर क्षय रुग्णालय, व जिल्हा कारागृहात प्रतिनियुक्तीवर
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पत्रा नव्हे आदेश देऊन ठेवण्यात आले आहे. परंतु नागपूर विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर विभागाकडून कुठलेही आदेश पत्र नसताना वरिष्ठांच्या आदेश धुडकावून शल्य रुग्णालयात डॉक्टर शितल तोडासे यांना 2020 पासून क्षय रुग्णालयात पदभार देण्यात आले आहे.
विशेष बाब अशी आहे की, डॉक्टर शितल तोडासे, ह्या क्षय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी . डाँ.हेमचंद कन्नाके यांच्या पत्नी आहेत. मागील साडेचार वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनेक प्रभार बहाल करून घेत धन्य झाले आहेत.
डॉ. तोडासेना क्षय रुग्णालयात चार दिवस, तर दोन दिवस जिल्हा कारागृहात सेवा देण्याची आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपल्या अधिकारातून दिले आहेत. ते आदेश कशाच्या भरोशावर दिले? त्यांना असे प्रति नियुक्तीचे आदेश देण्याचे अधिकार तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे स्वतः डॉक्टर चिंचोळे यांनी ग्रहण केले. परंतु नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा अधिकारी डॉक्टर कंचन वानेरे
यांना विचारणा केली असता. त्या म्हणाल्या की, कुठल्याही प्रकारचे नियुक्तीचे पत्र चंद्रपूर आरोग्य विभागाला देण्यात आलेला नाही. त्यामुळे डॉक्टर शितल तोडाशींची प्रतिनियुक्ती ही नियमबाह्य आहे. असेच आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे याबाबत माहिती घेतली असता . ते म्हणाले की, त्यांची प्रतिनियुक्तीसाठी क्षय विभागातून मागणी झाल्याने. त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात, क्षय रुग्णालयात त्यांची प्रतिनुक्ती माझ्या आदेशान्वयी करण्यात आली. ती तात्पुरती स्वरूपाची असल्याची माध्यमांना सांगितले.