संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ सुबोध जुन्नावारला कशाच्या आधारावर ?





संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ सुबोध जुन्नावारला कशाच्या आधारावर ?


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे स्वि सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले. सुबोध जुननावार यांना काही दिवसांपूर्वी एक आजार झाला होता. त्या आजाराच्या आधारावर शासकीय रुग्णालयातून त्याला 42 टक्के अपंगत्व असल्याचे अस्थायी स्वरूपाचे तीन वर्षासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. त्या आधारावर त्यांनी विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत लाभ मंजुरीचे आदेश या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी म्हणून समावेश करणारा संजय गांधी योजना समितीने दिनांक ११/ ३ /२०२४ ला मान्यता दिली. त्यांना पंधराशे रुपये अर्थसाह्य दर महा प्रदान केले जाईल असे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातील तहसीलदार स.गा.यो. मनपा क्षेत्र चंद्रपूर यांच्याकडून देण्यात आले.
हा संबंधित अहवाल वैद्यकीय अहवालानुसार दिल्याचे बोलले गेले असले तरी. संबंधित लाभार्थी आमदाराकडे आजही  स्वी सहाय्यक  म्हणून काम करीत  असताना. कार्यालयातील  तलाठी  लहांमगे यांनी  अहवाल  कशाच्या आधारावर बनवला.  त्या अहवालात सुबोध जुनूनवार खाजगी संगणक ऑपरेटर असून ते 42 टक्के अपंगत्व आहेत. तसेच त्यांची पत्नी व भाऊ खाजगी संगणक ऑपरेटर चे काम करतात त्यांचे थ्री बीएचके फ्लॅट असून  ते तिथे राहतात. त्या आधारे सर्वजण एकत्रित राहून आपला उदरनिर्वाह करतात असा अहवाल तलाठ्यांनी तहसील कार्यालयात  सादर केल्याची माहिती मिळाली. मग नेमका संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कुणाला?
  संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी महानगरपालिका चंद्रपूर तर्फे या कमिटीचे  अध्यक्ष  भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी  ब्रिज भूषण  पाझारे   यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हि कमिटी अकरा  सदस्याची असून  त्यात    राजकीय सदस्य असल्याची दिसून येते.
  मंडल अधिकारी द्वारा अहवाल तयार करण्याचे काम केले जाते. येथील मंडल अधिकाऱ्याने सुबोध जुनूनवार यांच्या अहवाल बनवताना कशाच्या आधारावर तो अहवाल बनवून  तहसील कार्यालयातील  संजय गांधी निराधार योजनेच्या  तहसीलदाराकडे पाठवण्यात आला. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
   एवढेच नाही तर हा अहवाल अध्यक्षांनी   तहसील कार्यालयात ऑनलाइन सबमिट केलेची दिसून येते. संबंधित कागदपत्राची पडताळणी न करता अस्थायीस्वरूपाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र  असताना या आधारावर संजय गांधी योजनेचा लाभ या लाभार्थ्याला घेता येतो का? असा प्रश्न आता सर्वसामान्य  नागरिकाकडून विचारला जात आहे.

 संजय गांधी निराधार योजनेच्या महानगरपालिकेच्या कमिटीतील अध्यक्ष ब्रिजभुषन पाझारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सुबोध जुनूनवर  यांना अपंगत्व नाही आहे. तसे जर असेल तर त्याची शहानिशा करून त्याचे प्रमाणपत्र रद्द करू  तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे त्याची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून  शहानिशा करून ते प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करू असे ते म्हणाले.  संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला.  त्यावर तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश निर्देश देण्यात आले आहे. तसेच संबंधित यात कोणी गुन्हेगार असेल तर त्यावर  कारवाई करण्यात येईल.
अशी फोनवरून त्यांनी प्रतिक्रिया दिली.

 याच संदर्भाची पडताळणी केली असता संबंधित  नायब तहसीलदार कुचनकर मॅडम म्हणाल्या की,  
माझ्याकडे अनेक अहवाल असतात. मी फक्त थम मारण्याचे काम करते. बाकी कागदपत्राची पडताळणी करण्याचे काम आमचे कर्मचारी करतात. परंतु कुठल्याही परिस्थितीत अस्थायी स्वरूपाच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच जर झाले असेल तर ते प्रमाणपत्र आम्ही नक्कीच रद्द करू  तसेच माझ्याकडे राजकीय फोन  आले होते . मी निवडणुकीच्या  कामात व्यस्त असल्यामुळे मी ते फोन रिसिव्ह केले नाही. मला राजकीय   नेत्याकडून ऑफिसमध्ये बोलवण्यात आले होते.
अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.