चिमूर भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताह
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील भिवकुंड येथे 'ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदीरात' अखंड श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन सोमवार दि. ३१ मार्च २०२४ ते रविवार दि. ६ एप्रिल २०२४ पर्यंत करण्यात आले आहे. मागील १८ वर्षापासून दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात शिवमहापुराण भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
दिनांक ३१/ 3/202४ ला साडेसहा वाजता घटस्थापना,
प्रार्थना व हरिपाठ,दिप उत्सव व दिंडी सोहळा, भजन मंडळ, संत दर्शन, इत्यादी दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रम ● रविवार दि. ६/४/२०२४ ला कथाव्यास प.पु. गुरुवर्य ईश्वर महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात आमडी (बे.), खेक, कोरा, पेरखेडा, दसोडा, धामनगांव, सिल्ली, रंगाबोडी, खानगांव, माकोना, वाहनगांव, खापरी बोधली, खडसंगी, सावरी व परिसरातील समस्त जनता जनार्धन मंडळी
परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदीर समिती, भिवकुंड यांच्याकडून करण्यात येत आहे.
शिवमहापुराण भागवत कथा सप्ताहात येताना नागरिकांना नशापाणी करुन येण्यास सक्त मनाई आहे.