जाणता राजा मध्ये मनोज डांगरे यांनी साकारल्या विविध भुमीका
नाटकात डांगरे चा अभिनय आकर्षणाचा बिंदु
दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर(प्रतिनिधी) दिनांक 7/2/2024 जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर मुनगंटटीवार यांच्या पुढाकारातुन सांस्कृतीक विभाग महाराष्ट्र शासन व चंद्रपुर जिल्हा प्रशासन यांच्या वतीने स्थानिक चांदा क्लॅब ग्राऊड येथे जाणता राजा या महानाट्याचे चार दिवस निशुल्क सादरीकरण झाले असुन, या नाटकात जिल्हा परिषद चंद्रपुर येथे कार्यरत असलेले मनोज डांगरे यांनी विविध भुमिका साकरल्या आहे. नाटकात भुमिका जरी छोट्या असल्या तरीपण त्यांच्या अभिनय हा नाटकाच आकर्षण ठरला आहे.
मनोज डांगरे हे मुळचे चंद्रपुरचे असुन , यांना अभिनयाची आवड आहे. जेव्हा यांना कळले की, चंद्रपुर शहरात जाणाता राजा महानाट्य होणार आहे. तेव्हा पासुनच त्यांना नाटाकात आपली पण एखादी भुमिका असावी. असे वाटत होते. त्यानुसार ते कामाला लागले. नाट्यामध्ये बरेच स्थानिक कलावंतांना स्थान देण्यात आले असुन, यामध्ये मनोज डांगरे यांना सुध्दा संधी चालुन आली. अभिनय करण्यास पात्र ठरले. मनोज डांगरे यांनी या महानाट्यात विविधांगी भुमिका पार पाडल्या असुन, यामध्ये पठाण, खान , मावळा, अष्टमंडळ, अशा भुमिका पार पाडत . नाटकात पठाण च्या भुमिकेतील "कतले आम करो-- दुश्मनोकी खाल खिचकर देवगिरी के दरवाजेपर लटका दिया जाय" हा डॉयलॉग खुप गाजला. त्यांनी केलेल्या भुमिका त्यांच्या शरीरयष्टीला साजेशा झाल्या असल्यामुळे, कमी वेळाच्या भुमिका सुध्दा आकर्षक ठरल्या आहे. मनोज डांगरे यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.