जिल्हा क्रीडा संकुलन देतोय अपघाताला आमंत्रण chandrapur jilhakrida adhikari ! क्रीडा महोत्सवाच्या नावावर करोडोंची उधळपट्टी



जिल्हा क्रीडा संकुलन देतोय अपघाताला आमंत्रण !


क्रीडा महोत्सवाच्या नावावर करोडोंची उधळपट्टी

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, युवकांना व नागरिकांना सरावासाठी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा क्रीडा संकुलन अस्तित्वात आहे. मात्र प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे ते आज जीर्णवस्थेत आहे.

एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री देशातील 67 वी राष्ट्रीय नॅशनल ओलंपिक खेळाचे आयोजन आपल्या विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे नवनियुक्त क्रीडा संकुलनात भव्य दिव्य स्वरूपात संपन्न केला. त्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेची देशभरात चर्चा झाली. त्यासाठी करोडो रुपयाचा खर्चही करण्यात आला. देशभरातून जवळपास 1600 खेळाडू सहभागी झाले होते.
त्यानंतर जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुलनात तालुकास्तरावरील शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आला होता. त्या स्पर्धेत क्रीडा अधिकारी यांच्याकडून शासन स्तरावर करोडो रुपयाचा खर्च करण्यात आला.
हे सर्व होत असताना जिल्ह्यातील केंद्रस्थानी एकमेव असलेले क्रीडा संकुलन जीर्ण अवस्थेत आहे, शेवटच्या घटका मोजतो आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणाच्या अपघाताला आमंत्रण देतो की काय अशी अवस्था या संकुलनाची झाली आहे. जर भविष्यात अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा प्रश्न आता इथे येणाऱ्या नागरिकाचा होत आहे.
ज्या जिल्हा संकुलनात वर्षभरापासून अनेक कामे सुरू आहेत. मात्र अजूनही ते कोणतेही पूर्णत्वास गेलेले नाही. वर्षभरापासून 1करोड 57लाख 15 हजाराचे जलतरणाचे काम सुरू आहे. परंतु ते अजूनही पूर्ण झालेले नाही.
बॅडमिंटन कोठ ही जैसे ते आहे. सिंथेटिक कॅट करोडो रुपये लावून बनवण्यात आला. खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. जिल्हा स्टेडियम येथे वस्तीगृहाच्या 26 रूम उपलब्ध आहेत तू त्याही निकामी झालेल्या आहेत विद्यार्थी तिथे राहत नाही. क्रीडा संकुलनात वृक्षारोपणाची अत्यंत आवश्यकता असताना सुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणात वृक्षाची लागवड करण्यात आलेली नाही मग येणारा दरवर्षीचा वृक्षारोपणाचा निधी जातो कुठे प्रश्न नागरिक करत आहेत?
स्केटिंग ग्राउंड हे पण अजूनही पूर्णत्वास नाही.
एवढे काम सोडले तर जिल्हा संकुलनात अनेक समस्येचे माहेरघर बनले आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नावलौकिक व्हावे या दृष्टिकोनातून नॅशनल ओलंपिक स्पर्धा ही चंद्रपूरात घेण्यात आली. मात्र या चंद्रपूरचे वैभव असणारे जिल्हा संकुलन प्रशासनाच्या नहाककर्त्या मुळे शेवटच्या घटका मोजत आहे. या सर्व बाबतची माहिती घेण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले असता कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कार माहिती देण्यात टाळाटाळ केली. जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.