EVM विरोधात चंद्रपुरात 22 जाने. ला आंदोलन




EVM विरोधात चंद्रपुरात 22 जाने. ला आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षण, स्वास्थ्य, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, बलात्कार, शेतकरी आत्महत्या, युवकांना काम देण्या ऐवजी नशेच्या आहारी दिल्या जात आहे. शेतमालावर निर्यात बंदी आणून केंद्रातील बीजेपीचे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्ये प्रवृत्त करीत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी जनतेचे हक्क हिरावून जनतेला संकटात टाकत आहे... याला कारण म्हणजे वर्तमान भाजप सरकारला EVM मध्ये मतांची हेराफेरी करून निवडून येण्याचा विस्वास आहे. आज पर्यंत लोकांद्वारा निवडून आलेल्या सरकारने सामान्य माणसाचे शोषण केले नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरकार शोषण करत आहे. विरोधी पक्षांची सरकारे हजारो करोड खर्च करून पडल्या जात आहे. प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांना ED, CBI v इनकम टॅक्स ची भीती दाखवून त्रास दिल्या जात आहे. काहींना तर जेल मधेही टाकले आहे.
कारण बीजेपी ला EVM मॅनेज करून निवडून येण्याचा विस्वास आहे.19 लाख EVM ची निवडणूक आयोगाच्या ताब्यातून चोरी केल्या गेली आहे. या EVM च्या माध्यमातून मतदान हेरफेर करून बीजेपी लोकशाही चे अपहरणं करून सत्तेवर येत आहे. तेव्हा देश, लोकशाही व भारतीय संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
जगतील कोणतेही लोकशाही राष्ट्र EVM नी निवडणुका घेत नाही. 2004 च्या निवडणुकीत EVM ला विरोध करणारी बीजेपी आता EVM चा व निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून सत्तेवर येत आहे व सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत ढकलून ओबीसी, एससी, एसटी मायनारिटी चे संविधानिक व मानवीय अधिकार हिरावत आहे व इंग्रज धर्जिन्या व देशात धार्मिक दंगे घडवीणाऱ्या RSS सारख्या संविधान व भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या घटना विरोधी RSS च्या ईशाऱ्यावर काम करीत आहे.
मागील दहा वर्षांपासून केंद्र सरकार मध्ये सत्तेवर असलेले बीजेपी सरकार लोकाहिताला बगल देऊन 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचे नावावर देशात धार्मिक दंगली घडवू पाहत आहे.
म्हणून आगामी लोकसभेच्या निवडणुका EVM ने न घेता बॅलेट पेपर ने घ्याव्या यासाठी दिल्ली येथे हजारो वकील व नागरिक आंदोलन करीत आहे. या देशभक्त आंदोलकांना समर्थन देण्यासाठी व EVM मुळे लोकशाही, संविधान व देशासमोर हुकूमशाही चा धोका निर्माण झाला आहे. म्हणून EVM हटाव व लोकशाही बचाव च्या मागणी साठी येत्या 22 जाने 2024 ला चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट जवळ सायं 5 ते 7 वाजे दरम्यान शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय दि 15 जाने ला मातोश्री सभागृह तुकूम चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या शेकडो कार्यकर्त्याच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला विविध सामाजिक व राजकीय संघटनाचे शेकडो प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांना बळीराज धोटे, राजकुमार जवादे, डॉ राकेश गावतुरे, एझाज शेख, भास्करराव मुन, डॉ. टी डी कोसे, समीर कदम, ऍड. प्रीतीशा शहा, प्रा. दत्ता सर, ई नी मार्गदर्शन केले.