चंद्रपुरात दोन, तीन, चार फेब्रुवारीला " जाणता राजा" महानाटयांचे आयोजन





चंद्रपुरात दोन, तीन, चार फेब्रुवारीला " जाणता राजा" महानाटयांचे आयोजन

जनतेनी याचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, यांचे शासन निर्णय क्र.संकीर्ण- ८२२३/प्र.क्र.५५७/सां.का.४, दिनांक २२ डिसेंबर, २०२३ अन्वये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त राज्यभर आयोजित करावयाचे महानाटयांच्या सादरीकरणासाठी चंद्रपूर जिल्हयात सलग तीन दिवस दिनांक ०२ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत चांदा क्लब गाऊंड, चंद्रपूर येथे सायंकाळी ६.०० ते ९.४५ दरम्यान " जाणता राजा" महानाटयांचे आयोजन केले आहे. सदर महानाट्यांचे आयोजन व नियोजन करीता आवश्यक समित्या गठीत करण्यांत आलेल्या आहेत. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांचेहस्ते दि. २/२/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार असुन, इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार आहेत.
सदर कार्यक्रम हा विनामुल्य असुन, प्रत्येक दिवशी १०००० नागरिकांना पाहता येईल याबाबत आयोजन तथा नियोजन करण्यांत आले आहे. व कार्यक्रम पाहण्यास प्रत्येक दिवसाकरिता नागरिकांसाठी, विविधि संघटना (डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी) इत्यादीसाठी पासेस ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असुन, प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या ठिकाणी देखील जनतेसाठी पासेस वितरणाची व्यवस्था करण्यांत आलेली आहे. प्रवेशिकेशिवाय सदर कार्यक्रमास प्रवेश मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
तरी जिल्हा प्रशासनातर्फे चंद्रपूर जिल्हयातील समस्त नागरीकांना कार्यक्रमाकरीता उपस्थित राहण्यासाठी
आज झालेल्या पत्रकार परिषदेतून समस्त जनतेला आवाहन करण्यांत येत आहे.