चंद्रपूर शहरात निघाली संविधान सन्मान बाईक रॅली
विविध संघटनाच्या शेकडो कार्यकर्त्याचा सहभाग
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नागरिकांना संविधानिक मुल्यांचे महत्व कळावे व संविधान संरक्षणासाठी नागरिकांनी नित्य प्रयत्न करीत राहावे व संविधान विरोधकांचा काढडून विरोध करावा यासाठी चंद्रपूर शहरात दि 26 जाने 2024 ला भव्य संविधान सन्मान बाईक रॅलीचे यशस्वी पणे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत सहभागी कार्यकर्ते
संविधान के सन्मान मे - सारा भारत मैदान मे
संविधान विरोधीयो - भारत छोडो भारत छोडो
बँक चोरो - भारत छोडो भारत छोडो
भारत विरोधीयो - भारत छोडो भारत छोडो
दंगाइयों - भारत छोडो भारत छोडो ई घोषणा देत होते.
26 जाने. ला प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपूर शहरात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संविधान सन्मान बाईक रॅलीचे आयोजन केले होते. 26 नोव्हे 1949 ला संविधान सभेने भारतीय संविधानाला मान्यता दिली असली तरी संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जाने 1050 पासून सुरु झाली. 26 जाने 1950 पासून भारतीय संविधान लागू झाल्यामुळे भारतात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व धर्मानिरापेक्षता या मानवीय तत्वाचा अंमल सुरु झाला. यापूर्वी हजारो वर्ष जात, धर्म, लिंग ई आधारावर व्यक्ती व्यक्ती मध्ये केला जाणारा भेद संपुष्टात आला. म्हणून 26 जाने. हा दिवस सर्व भराटीयासाठी खऱ्या अर्थाने मानव मुक्ती दिन आहे.
26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनाचे महत्व काही जात्यांध व मानवता द्रोही विचाराचे लोक कमी करण्याचा, समोविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्काची माहिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पिहचाविण्याची जबाबदारी देशातील सुज्ञ नागरिकांची आहे. या उदधेशानेच चंद्रपुरात 26 जाने 2024 ला संविधान सन्मान बाईक रॅली चे आयोजनगांधी चौक येथून करण्यात आले होते. या रॅलीत सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, काँग्रेस, आप, MIM, बामसेफ, महिला काँग्रेस, ओबीसी जनगणना समन्वय समिती, सत्यशोधक समाज, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन, भारत जोडो यात्रा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, संविधान शाखा, स्वतंत्र मजदूर युनियन, जेष्ठ नागरिक संघ, मुस्लिम आरक्षण परिषद हमसफर गार्डन ग्रुप, ई संघटनाच्या कार्यकर्त्यांनी बळीराज धोटे, ऍड फरहाद बेग, गोपाल अमृतकर, अनिरुद्ध वनकर, हरीश सहारे, सचिन रामटेके, भास्कर मुन, मुन्ना आवळे, योगेश आपटे, माजी महापौर संगीता अमृतकर, प्रसन्न शिरवार,प्रा. सुरेश विधाते, चंदाताई वैरागडे, मीनाताई खणके, बापू अन्सारी, येशूताई पोतनवार, उमाकांत धांडे, नितीन बनसोड, रवींद्र चिलबुले, भास्कर सपाट, MIM चे प्रदीप अडकीने, पी. एम. जाधव, महामूद भाई, इंजि अशोक म्हस्के, सूर्यभान झाडें, राजकुमार जवादे, प्रा. टी डी कोसे, मोंटो मानकर, सुनील जुनघरी, दिलीप होरे, पांडुरंगजी गावतुरे, प्रा. माधव गुरनुले, विलास माथणकर, राहुल गायकांबळे ई चे नेतृत्वात तीनशे वर कार्यकर्ते आपापल्या बाईक सह सहभागी झाले होते.