माधवाचा प्रयोग झाला आता केशवाचा प्रयोग झाला पाहिजे- कल्याण दळे





माधवाचा प्रयोग झाला आता केशवाचा प्रयोग झाला पाहिजे- कल्याण दळे

इंदापूरच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात कल्याण दळे यांच्या महत्वपूर्ण भाषण

दिनचर्या न्युज :-
इंदापूर (प्रतिनिधी)
आज झालेल्या इंदापूर येथील ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा लाखोच्या जनसमुदायात पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांनी कशाचीही तमा न बाळगता जनसमुदायाने मेळाव्यात हजेरी लावली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ओबीसींना त्याच्या न्याय हक्कापासून दूर ठेवण्याचे कटकारस्थान केल्या जात आहे. मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ, महादेवराव जानकर , कल्याण दळे, अन्सार साहेब, प्रकाश शेडागे, प्राध्यापक मुंडे, गोपीचंद पडळकर, गायकवाड, प्रताप गोर, रमेश राऊत, शिंदे(तात्या) मंचावर उपस्थित होते.
या मेळाव्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष तथा बारा बलुतेदार भटक्या विमुक्त समाजाचे नेते कल्याण दळे म्हणाले की, महाराष्ट्रात या लोक चळवळीला भुजबळ साहेबांनी न्याय देण्याचं काम केलं. साहेब, आपणास विनंती आहे की, महाराष्ट्रात तमाम ओबीसी मागासवर्गीय आयोगाने सर्व समाजातील जातीची जनगणना केली पाहिजे, यापुढे मी म्हणेल, राजकीय जनगणना सर्व समाजाची झाली पाहिजे. मी जालनाचा आहे. जालन्यात उपोषण सुरू आहेत. आम्ही पिढ्यान पिढ्या उपोषण करीत आहो त्याचे काय? बारा बलुतेदार स्वातंत्र्यानंतरही सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक, राजकीय उपोषित - कुपोषित आहेत. आता महाराष्ट्रात ओबीसीचे आमदारच नाही तर, यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सावित्रीबाई लेकीचा झाला पाहिजे. निवडणुकीत नाटकं नको! बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण झाले पाहिजे! बारा बरोबर बलूतेदारांचा मुख्यमंत्री निवडून देण्याची हिंमत ठेवा . आणि ती भुजबळ साहेबांच्या रूपाने आपल्याला ओबीसी नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिक्षण नाही, दीड एकर जमीन नाही अशा माधवांचा प्रयोग झाला .आता 2024 मध्ये केशवांचा प्रयोग झाला पाहिजे असे प्रखळ मत कल्याण दळे यांनी मांडले. राजकीय आंबेडकरी चळवळ, ओबीसी चळवळ आहेत. महाराष्ट्रात चळवळ महात्मा फुले छत्रपती...
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. बारा बलुतेदार आम्ही खरे वंशज असून चारशे जातींपैकी साडेचार साडेतीनशे जाती मायक्रो ओबिसी आहेत. म्हणून मुख्यमंत्री हा ओबीसीचा झाला पाहिजे. सावित्रीबाई लेकीचा विचाराचा झाला पाहिजे असे आज झालेल्या इंदापूर ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात कल्याण दळे सभेला संबोधित करताना म्हणाले.