खरंच 'तो' ओबीसी नेता आहे का? की, मंचावरचा!
स्वयंभू नेत्याला आत्मचिंतनाची गरज !
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये,मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे या मागणीसाठी
ओबीसी योद्धे रविंद्र टोंगे, प्रेमानंद जोगी, विजय बल्की, अक्षय लांजेवार, अजित सुकारे यांनी आमरण उपोषण केले. यात जिल्ह्यातील सर्व नेतृत्व एकवटले असताना या आंदोलनाकडे स्वयंभुुघोषित ओबीसी नेत्याने सपशेल पाठ फिरवली होती.
यापूर्वी चंद्रपुरात ओबीसी समाजाचा भव्य दिव्य असा महामोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चातही स्वयंभुघोषित नेत्यांनी पाठ फिरवली. सध्या महाराष्ट्रात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीचा बुलंद आवाज छगन भुजबळ एकाकी लढा देत आहेत. त्यांना बहुजनवादी समाजाचा भर भक्कम पाठिंबा आहे. सरकारमध्ये असताना सुद्धा या नेत्यांनी ओबीसी बचाव आंदोलन उभारलेला आहे. आता काही दिवसातच नांदेडला भव्य ओबीसीच्या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात होत असलेल्या ओबीसी बचाव आंदोलनात कुठेही या स्वयंघोषित नेत्याचे मुखवटे दिसले नाही. मात्र आपल्याच चार भिंतीच्या आत मध्ये ओबीसी परिषद घेऊन त्याचे निवेदन मात्र एकट्यानेच राजकीय पक्षाच्या पुढा-याला देऊन सोशल मीडियावर फोटोसेशन केले. मग एवढेच आहे तर यासोबत असलेल्या अनेक ओबीसी जात प्रतिनिधींनी सोबत दिसून आले नाही. हाही प्रश्न समाजातील ओबीसीना भेडसावत आहे.
यावरून आता असे वाटायला लागले, खरंच 'तो' 'ओबीसी नेता आहे का? का,फक्त मंचावरचा !याची स्वयंभुघोषित नेत्याला आत्मचिंतनाची गरज आहे!
ओबीसी परिषदेचा समाजात संभ्रम तर आहेच ,ओबीसी संवर्गातील जात निहाय संघटना यापूर्वी मोठ्या प्रमाणात महामोर्चा सामील झाल्या होत्या. हे विसरता कामा नये!
परिषदेला उपस्थित जातनिहाय व्यक्तीची नावे माध्यमावर यायला हवी होती?
ओबीसी समाजात कोणी घुसकरी करू नये आमच्या वाटातलं कुणाला जाऊ नये यासाठी ओबीसी योद्धा चंद्रपुरा 19 दिवस तर चिमूरात सात दिवस उपोषण करून शासनाकडून दहा पैकी आठ मागण्या पूर्ण करून घेतल्या. त्यावेळी या स्वयंभुघोषित नेत्याने त्या उपोषणाला बसलेल्या ओबीसी योद्धाची साधी भेट सुद्धा घेतली नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून ओबीसी आंदोलन केले पाहीजे? चार भिंतीच्या आत भोंग्यावर बोंबलणारा बुलंद आवाज होत नाही. त्यासाठी आर्त:भावनेने ओबीसीचा कळवळला असले पाहिजे.
स्वतःच्या स्वार्थासाठी जिकडे सत्ता तिकडे प्रवेश करून मी ओबीसीचा नेता म्हणून घेणे? आता ओबीसी समाजातील सर्व घटकांना स्वयंघोषित नेत्याचा दल- बदलूपणा समजन
आले.भविष्यासात लोकप्रतिनिधी बनावह याचे डोहाळे लागले असून जनता चांगली समजदार झाली आहे.तृत एवढेच !