अधिकाऱ्यांची कॅबिन सोडून, जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात लागला तिसरा डोळा!
पारदर्शकता की, मन मर्जी ! होतोय चर्चा!
दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषद ही अनेकदा काही ना काही वेगळेपणा करून झेडपी वादग्रस्त असतोस. अशाच एक प्रामाणिक पणाचा किस्सा आता
जिल्हा परिषदच्या वित्त विभागात (कॅपो ) वित्त लेखा अधिकारी विराजमान झाले तेव्हापासून वित्त विभागातील कामात पारदर्शकता यावी यासाठी सर्व वित्त विभागातील कार्यालयाच्या रूम मध्ये तिसरा डोळा लावला गेला! यामुळे कर्मचाऱ्यांची येण्याची ,जाण्याची कामासाठी कोण कुणाकडे आला याची हित भूत माहिती संबंधित अधिकाऱ्यांना होत असतो. साधे कर्मचाऱ्यांना लघुसंखेलाही जायचे असल्यास दहा मिनिटात वापस यावे लागते. एवढी कळक नजर या तिसऱ्या डोळ्यामुळे असून येथील कर्मचारी मूक बधिर झाले आहेत. क्षणोक्षणी निगराणी असून अधिकारी बाहेर जरी असले तरी त्यांनी आपल्या मोबाईल वरून थेट निग्राणीचे पाळत ठेवली आहे.
वित्त विभागात तिसरा डोळा लावला असला तरी संबंधित विभागातील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये सुद्धा तिसरा डोळा लावला असता तर त्यापेक्षाही कर्मचाऱ्यारी, नागरिकांना आनंद झाला असता? असा सूर आता जिल्हा परिषद मध्ये उमटु लागला आहे. वारंवार होत असलेल्या मीटिंगने कर्मचारी चांगलेच वैतागले असून, भविष्यात एखाद्या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका तर येणार नाही ना? असे नाकारता येत नसून,अशी ही कुजबूज सध्या झेडपीच्या कर्मचाऱ्यात सुरू आहे.
सर्वसामान्यांना असा प्रश्न पडतो की, या तिसऱ्या डोळ्यासाठी सर्व विभाग सोडून मुख्याधिकारी
( सिओ )यांनी फक्त याच विभागासाठी परवानगी आणि निधी उपलब्ध करून दिला का? आणि तो कुठल्या निधीतून उपलब्ध करून दिला असाही प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकासह, कर्मचाऱ्यात पडला आहे.
सूत्राच्या माहितीनुसार वित्त विभागात काही दिवसातच खळबळ जनक माहिती समोर येत असल्याची चर्चाही सुरू आहे. खरंच या तिसऱ्या डोळ्यामुळे, झेडपीत पारदर्शकता येईल का ? की,अधिकाऱ्यांची मनमर्जी म्हणायची! अशी चर्चा झेडपीच्या परिसरात सुरू आहे.