'आमचा धंदा तुम्ही करा! आणि ओबीसीत या'! हिंगोलीत ओबीसी मेळाव्यात कल्याण दळे यांचे महत्वपूर्ण भाषण




'आमचा धंदा तुम्ही करा! आणि ओबीसीत या'! हिंगोलीत ओबीसी मेळाव्यात कल्याण दळे यांचे महत्वपूर्ण भाषण


हिंगोली (प्रतिनिधी)
दिनचर्या न्युज :-
महाराष्ट्रातील हिंगोली येथे ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यातील लाखो ओबीसी बांधवांनी आपली उपस्थिती दाखवली. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष तथा बारा बलुतेदार भटके विमुक्त जमाती व मुस्लिम ओबीसी महासंघटनेचे नेते कल्याण दळे यांनी हिंगोलीत झालेल्या ओबीसी महामेळाव्यात आपल्या महत्वपूर्ण भाषणात म्हणाले, आता भाषणा सांगितले की, राजकारण्याने पक्षाचे जोडे बाजूला काढून ठेवा. माझं त्याही पलीकडे मन आहे . मी राजू सातव चा चेला आहे. राजू सातव आज हयात असते तर कल्याण दळे कुठल्या कुठे असते. जोडे बाजूला करू नका महाराष्ट्रात ओबीसीचा जोडा असणारा पक्ष तयार करा! आम्ही बलुतेदार कधी आमदार, खासदार होणार आहे. महाराष्ट्रात मायक्रो ओबीसीच्या 300 जाती आहेत. सत्तर वर्षात आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. 27% लाडू आम्हाला आरक्षणाचे मिळाले. पण ते लाडू कोणा कुणाला मिळाले ज्याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. आमच्यापर्यंत तिथे लाडू कधी आले नाही. आणि आले ही तर एक दोघांच्या वाट्याला आले. त्या लाडू चे मुरमुरे फेकून दिले. आणि आमच्या हाताला काहीच लागलं नाही. आम्हाला काहीच मिळत नसेल तर या राज्यातील राजकारण्यांनी 'आमचा धंदा तुम्ही करा! आणि ओबीसीत या! ओबीसी मिळाव्यात लाखो जनसमुदायात कल्याण दळे यांची स्पष्टओक्ती!
छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवणारा आमचा वंशाज आहे. म्हणून 'होता जीवा म्हणून वाचला शिवबा'! हि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार आणि भटक्या आलुतेदारांची लढाई आहे. म्हणून मी छोटा कार्यकर्ता असलो तरी आपणास सांगतो या महाराष्ट्रात स्वतंत्र पार्टी ओबीसीच्या हक्काची असली पाहिजे. आता आम्हाला दुसऱ्यांना मतदान करण्यात सांगू नका! देऊ नका! यानंतर आम्ही तिकीट देणारे तुम्ही पाहिजे आम्ही मागणार नाही. या महाराष्ट्रात स्वतंत्र पार्टी ओबीसीची काढली तर महाराष्ट्रात 50 आमदार होतील अशी अपेक्षा करतो. आमची स्वप्न कधी पहावं. विधान भवनाच्या गेटवर पास मिळत नाही. गावागावातील बहुजनांना, बलुतेदारांना वंचित राहावं लागत आहे. त्या वंचिताना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे.