गोल बाजारात वयोवृद्ध माणसाचा खून
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील गोल बाजार म्हणून प्रख्यात टिळक मैदान असलेल्या भागात धक्कादायक घटना घडली. भीक मागून आपली उपजीविका करणाऱ्या वयोवृद्धाचा गळा कापून खून केल्याची घटना उघडकीस आली. शहरात एखाद्या वृद्ध माणसाचा खून होणे, या मागचे नेमके कारण काय? या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वृद्ध मृतकाचे नाव मधुकर मंदेवार(70) असे असून तो विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलीस दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचतात घटनेची माहिती घेतली. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.