तिरूमला भवन जवळ अनोळखी व्यक्ती मृत्यू झालेला आढळा




तिरूमला भवन जवळ अनोळखी व्यक्ती मृत्यू झालेला आढळा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज दिनांक 27 /9 23 रोजी व्यंकना पवार यांनी येऊन पोलिस चौकी महाकाली चंद्रपूर येथे माहिती दिली की तिरूमला भवन जवळ भिवापूर वॉर्ड चंद्रपूर येथे रोडवर एक अनोळखी भीक मागणारा इसम मरण पावलेला आहे अशी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सतीश सिंग राजपूत, सोबत पीएसआय विजय मुके , पो. हवा. संजय धोटे हे तात्काळ घटनास्थळावर जाऊन सदर मृतकास उत्तरीय तपासणी करीतासामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आणले असता डॉक्टरांनी त्याच मृत घोषित केले वरून त्यास पुढील कारवाईस सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील मरचुरीत ठेवण्यात आले आहे , सदर मृतकाचे वर्णन खालील प्रमाणे- वय अंदाजे 60 ते 62 वर्ष, रंग सावळा ,चेहरा लांबट, अंगात जांभळ्या रंगाचा जॅकेट, शेंद्री रंगाचा फुल शर्ट ज्यावर पांढरे लाईन असलेला, व सिमेंट रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला, डोक्याचे केस काळे पांढरे ,दाढी मिशी काळी पांढरी वाढलेली, उंची 5 फूट, मानेजवळ तीळ, उजव्या हातावर सुरेश नाव गोंदलेले, डाव्या हातावर अनिल शर्मा नाव गोंदलेले आहे तरी सदर मृतकास कोणी ओळखत असल्यास पोस्ट चंद्रपूर शहर येथे पोलिस निरीक्षक एस. आर. राजपूत मो.क्रं.8087031261 पीएसआय विजय मुके मो.क्रं.9923401065 यांचे मोबाईल वर संपर्क साधावा ही विनंती