रवींद्र टोंगेच्या समर्थनात ओबीसीचे मुंडन आंदोलन




रवींद्र टोंगेच्या समर्थनात ओबीसीचे मुंडन आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मागील अकरा दिवसापासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. 11 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या अन्न त्या आंदोलनाचा शासनाने कुठलाही कुठलीही दखल न घेतल्याने. शासनाच्या निषेधार्थ ओबीसी बांधवांनी रवींद्र टोंगे यांच्या समर्थनात मुंडन आंदोलन केले.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये, जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिले त्याची माहिती ओबीसी ना द्यावी तसेच राज्यात बहात्तर वस्तीगृह लवकरात लवकर सुरू करावी, सरसकट ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, अशा मागण्या घेऊन मागील अकरा दिवसापासून रवींद्र टोंगे उपोषणावर बसले आहेत. त्या समर्थनात युवकांनी आज मुंडन आंदोलन केले. महेश खंगार ,अंबादास बनकर ,संदीप तोडसाम ,दिलीप डोंगरे ,कृष्णा चांदेकर ,संतोष कुकटकर या ओबीसी बांधवांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले. आतापर्यंत सरकारला जाग येण्यासाठी चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात आला. जीआर ची होळी करण्यात आली. भीक मागो आंदोलन , मुंडण आंदोलने करण्यात आले.
आता तरी सरकारने या आंदोलनाचा धसका घ्यावा. अन्यथा ओबीसी बांधवांच्या सणशीलताच्या अंत पाहू नये. ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सरकारवर तारेचे ओडत म्हणाले की, मागील 11 दिवसापासून चंद्रपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहेत. एकीकडे जालना येथील जरांगे पाटील यांना शासन व्हीआयपी ट्रीटमेंट सारखे वागणूक दिली. दुसरीकडे ओबीसी बांधव संविधानिक मागण्या मागत असताना त्याच्याकडे सरकार डुखूनही बघत नाही. म्हणून सरकारने ओबीसी सन्मवय समितीला चर्चेसाठी बोलवावे. चर्चेतून मार्ग काढावे . नाहीतर अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील संबंधित उपोषणकर्त्याला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील.