भिवापूर वार्डात दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेचे उद्घाटन चंद्रपूर विधानसभेचे आमदार पुढे काँग्रेसचा असेल, किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाहीत -ना. विजय वडेट्टीवार




भिवापूर वार्डात दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेचे उद्घाटन

चंद्रपूर विधानसभेचे आमदार पुढे काँग्रेसचा असेल, किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाहीत -ना. विजय वडेट्टीवार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसभेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेचे उद्घाटन भिवापूर वार्डातील साई मंदिर येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाला दिल्लीचे ख्यातनाम पत्रकार श्री.अशोक वानखेडे हे प्रमुख वक्ते म्हणून हजर होते,सोबत आ.सुभाष धोटे,आ.किशोर जोरगेवार,आ.सुधाकर अडबाले,माजी आमदार देवराव भांडेकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे,काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके " चे उदघाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. विशेष म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील आमदार किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाही, पुढचा आमदार हा कांग्रेस पक्षाचा असेल.
असे वक्तव्य केले, त्यांच्या या वक्तव्यावर आमदार जोरगेवार बघतच राहिले.
या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाबरोबर विद्वान, अभ्यासू, आणि ज्यांनी देशासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांचे पुस्तकही उपलब्ध करावा. तसेच अंधश्रद्धे बाबत पुस्तके उपलब्ध करून द्यावी असे वडेट्टीवार म्हणाले.
दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींसाठी समर्पित असलेल्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचा एक प्रसंग आहे. त्यामुळे समाजातील दानशूर शिक्षणप्रेमीनी स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराने केले आहे.या कार्यक्रमाचे संचालन आरती दाचेवार तर आभार अशोक कोटकर यांनी केले.
आयोजित अभ्यासिका कार्यक्रमात परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.