१६ ला माऊली परिवारा तर्फे अधिक मासा निमित्य शिदोरी काला आणि सत्संगाचे आयोजन





१६ ला माऊली परिवारा तर्फे अधिक मासा निमित्य शिदोरी काला आणि सत्संगाचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथे दिनांक : १६ ऑगस्ट २०२३ ला श्री संत नगाजी महाराज मंदीर, पठाणपुरा, येथे
माऊली परिवार चंद्रपूर तर्फे सर्व माऊली परीवारातील भक्त माऊलींना व्यसन सोडा... नाते जोडा ,अधिक मासा निमित्य शिदोरी काला आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १६ ऑगस्ट २०२३ ला अधिक मास निमित्य शिदोरी काला व सत्संग श्री संत ह.भ.प. व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे, ह. भ. प. व्यसनमुक्ती सम्राट श्री रामेश्वर महाराज खोडे तथा व्यसनमुक्ती प्रचारक ह. भ. प. पवन महाराज खोडे यांच्या उपस्थितीत आयोजीत केलेला आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन सत्संग तथा संत दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच भक्तांनी येताना शिदोरी सोबत घेऊन यावी दुर्व्यसन सोडावे व व्यसनमुक्त व्हावे
असे आव्हान माऊली परिवारातर्फे करण्यात आले आहे.