मणिपुरातील त्या घटनेबाबत चंद्रपुरात निघाला सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा





मणिपुरातील त्या घटनेबाबत चंद्रपुरात निघाला सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मणिपूर येथील मागील तीन महिन्यापासून सामूहिक हिंसाचाराच्या घटनेमुळे जगातील सर्वात मोठ्या घटनेने सर्व देश हाधरून  गेले. मात्र भारत सरकारने याची थोडीशी या घटनेची दखल घेतली नसल्याने मोदी सरकारच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात गांधी चौकातून आज दुपारी 1 वाजता मोर्चा   काढण्यात आला. ही घटना देशातच नाही तर जगात सुद्धा भारताची प्रतिमा मल्लीन होत असल्याचे विदारक चित्र सर्वीकडे उमटत आहे. महिलांची सामूहिक नग्न धिंड काढून , महिलांच्या शरीरातल्या विविध भागाला अश्लील चाळेकरीत भर रस्त्यात त्यांची अब्रू लुटल्या जात आहे. त्यांच्यावर अ मानवी अत्याचार केले गेले. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेच्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकशाहीला व मानवाअधिकारला मानणाऱ्या सर्व स्तरातून निषेद करण्यात येत आहे. याचे पडसाद चंद्रपुरात ही आज सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा काढून केंद्र सरकारच्या निषेधार्थ नारेबाजी करण्यात आली.
हा मोर्चा गांधी चौक येथून जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय इथे सभेत रूपांतर होऊन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना या घटनेच्या संदर्भात निवेदन दिले. यावेळी चंद्रपुरातील हजारो च्या संख्येने नागरिकांनी या मोर्चा स्वयंपुरतीने सहभाग दर्शविला.


,