मतदारांनी हरकती व नावाची नोंदणी करावी : तहसिलदार प्राजक्ता बुरांडे Chimur tahshil




मतदारांनी हरकती व नावाची नोंदणी करावी : तहसिलदार प्राजक्ता बुरांडे

• मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर


 दिनचर्या न्युज :- 
चिमूर/प्रतिनिधी :-

आगामी होणा-या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरीता तसेच नावात दुरुस्ती, मय्यत दुबार कायमस्वरूपी स्थालांतरीत मतदारांना वगळणे, हरकती स्विकारणे तसेच नुतन मतदार नोंदणी करण्याकरीता मतदार यादीचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक २९ मे २०२३ च्या पत्रकानुसार २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हरकती व दावे स्विकारण्यात येणार आहे. ज्यांचे वय १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी फार्म ६ भरून द्यावा असे आवाहन ७४ चिमुर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत चिमुर उपविभागातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असुन त्याच्याव्दारे दिनांक २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदार यादी तपासणी करून घरोघरी भेट देवुन नविन मतदार, मृत्यु झालेले मतदार मतदार यादीतील नोंद दुरुस्ती तसेच मतदार यादीतील व मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे जसे अस्पष्ट छायाचित्र दुरुस्ती करणेकरीता त्रुटी तपासुन नमुना ६, ७, ८ भरून घेतील. दिनांक २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणार आहेत. तसेच दिनांक १७ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक केंद्रावर दावे व हरकती स्विकारणार आहेत.

या मोहीमेमध्ये मतदार यादी अचुक आणि निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फार्म ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी आयोगाच्या संकेत स्थळावर भेट द्यावी लागेल. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरूस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन तहसिलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज