चंद्रपूर शहरात डॉक्टरांनी केली आत्महत्या
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या डॉक्टर अग्रवाल दांपत्याचे रुग्णालय अस्तित्वात आहे. या रुग्णालयात पतीचे नेत्रालय रुग्णालय आहे. तर पत्नीचे दंतचिकषक म्हणून रुग्णालय आहेत.
चंद्रपूर शहरात नेत्रतज्ञ डॉक्टर उमेश अग्रवाल यांनी अचानक आत्महत्या केल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली . रात्री सात आठ वाजता च्या दरम्यान डॉक्टर अग्रवाल यांनी स्वतःच्या हाताला विष भरलेले इंजेक्शन स्वतः वाचून घेतले. आणि आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेची माहिती होताच आय एम एच ए पदाधिकारी तथा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा पंचनामा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पुढील कारवाई शहर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू आहे.