पंधरा दिवसापासून सर्वर निकामी झाल्याने तहसील कार्यालयातील ऑनलाइन सर्व कामे खोळबली!




पंधरा दिवसापासून सर्वर निकामी झाल्याने तहसील कार्यालयातील ऑनलाइन सर्व कामे खोळबली!

सरकारच्या ऑनलाईन खाजगीकरणाचा जनतेला फटका!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तहसील कार्यालयातील पंधरा दिवसापासून
सर्वर काम करीत नसल्याने विद्यार्थ्यासह पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका प्रावेट आयटी कंपनीला सर्वरचे काम दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची ऑनलाइन डॉक्युमेंट सबमिट करणे ,ऍडमिशन करणे तसेच तहसील कार्यालयातील कागदपत्रे तयार करणे, शेतकऱ्यांचे साठी लागणारे शेतीतचे कामे सगळी खोळबल्याने तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या छोट्या आयटी कंपनीला वेळेवर भुक्तान होत नसल्याने हेतू पुरस्कार ही कंपनी प्रशासनाला वेटीस धरत आहे. असे नाव न सांगता एका अधिकाऱ्याने आप भीती कथन केले.
महाराष्ट्र शासनाने ऑनलाइन चे कामे करण्यासाठी एका मोठ्या कंपनीला यासाठी कार्यान्वित करावे अशी मागणी होत आहे. नाहीतर तर काही दिवसासाठी ऑफलाइन कागदपत्रे बनवण्याची परवानगी प्रशासनाला द्यावी अशी मागणी होत आहे.
संबंधित विषयाची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली असता त्यांनी सचिवालयात माहिती देणार असल्याचे सांगितले.
एकीकडे शासन सर्व सुविधा ऑनलाइन वर मिळेल अशी तरतूद झाल्याचे वाजा गाजा करतो. परंतु शासनाच्या खाजगीकरणामुळे प्रशासनास सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. म्हणून शासनाने कुठलीही सुविधा कार्यान्वित करताना परिपूर्ण आहे की नाही त्याची शहानिशा करून ती सुरू करावी. अन्यथा नाक प्रशासनासह सामान्यानाही याचा फटका बसत आहे.