राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिट्टी देवुन
विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजप प्रवेश निश्चित
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपुरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे नावलौकिक असलेले ओबीसी , कुणबी समाजाचे नेते, विदर्भवादी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिट्टीकडून भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा पक्ष श्रेष्ठीकडे पाठवणार असलेल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी समाजातील पोकळी भरून काढण्यासाठी आपण भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
दि. 25 जून 2023 रोजी जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३.३० वाजता विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील विदर्भ विकास चळवळ व ओबीसी चळवळीतील अग्रणी नेतृत्व डॉ. अशोक जीवतोडे यांचा सन्मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणविस व सन्मा. आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विनंतीस मान देवून भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे.
या सोहळ्याला प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस, वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीरजी मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजजी अहिर, माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस, आमदार श्री. बंटीजी भांगडिया, आमदार श्री. परिणयजी फुके, आमदार श्री. संजीवजी बोदकुलवार, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. देवरावजी भोंगळे, माजी आमदार श्री. अतुलजी देशकर, माजी आमदार श्री. सुदर्शनजी निमकर, माजी आमदार श्री. संजयजी धोटे, भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे तथा भारतीय जनता पक्षातील समस्त आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.