.. त्या महिलेच्या खूणाचे रहस्य चार तासात पोलिसानी उलघडले





... त्या महिलेच्या खूणाचे रहस्य चार तासात पोलिसानी उलघडले

चंद्रपुर शहरातील ७० वर्षीय महीलेच्या हत्याकांडातील आरोपीचा शोध

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पोलीसांना यश अवघ्या चार तासांत आरोपीस अटक

दिनचर्या न्यूज
चंद्रपूर :-
दिनांक १७/०५/२०२३ रोजीचे रात्री दरम्यान फिर्यादी नामे कपील श्रीराम सुखाडे, वय ४२ वर्ष, सवारी बंगल्याजवळ, नगीनाबाग, चंद्रपुर, जि. चंद्रपूर यांनी दिनांक १६/०५/२०२३ रोजी सायंकाळी ०७.०० वा. चे दरम्यान त्यांचे घरी हजर असतांना त्यांचे घराशेजारील राहणारी मृतक श्रीमती शर्मीला शंकरराव सकदेव, वय ६६ वर्ष हिची मुलगी पिंकी साखरे हीचा फोन आला व तीने सांगितले की, तीची आई म्हणजे मृतक हिला ब-याचदा तीच्या मुलीने फोन केला परंतु तीची आई फोन उचलत नाही आहे, असे सांगितल्यावर फोन देण्यासाठी मृतक नामे शर्मीला सकदेव यांच्या घरी गेलो असता, मृतक ही तीच्या घरात फरशीवर रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडून दिसल्या व आजुबाजूला रक्त सांडलेले दिसले. तेव्हा फिर्यादीने आजुबाजुच्या लोकांना बोलावून ११२ क्रमांकावर फोन करून पोलीसांना माहिती दिली. अशा रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अप.क्र. ५१७ / २०२३ कलम ३०२, भादवि चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी सपोनि. बोबडे, पोउपनि भुरले, पोउपनि कावळे यांचे वेगवेगळे विशेष पथके तयार करून त्यांना सदर हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणेकामी घटनास्थळ व आजुबाजुच्या परीसरात रवाना केले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी भाडेकरू अनुप सदानंद कोहपरे वय 26 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीस चामोर्शी, जि. गडचिरोली येथून ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने त्याची घरमालकीन मृतक श्रीमती शर्मीला शंकरराव सकदेव ही घराचे किराया देण्यावरून नेहमी वाद घालत होती व आज सुद्धा घरमालकीन ने किराया देण्यावरून वाद घातल्याने आरोपीचा राग अनावर झाल्याने आरोपीने मृतकाचा डोका फरशीवर आदळून व गळा दाबून मारून पसार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली.

अशा प्रकारे अत्यंत संवेदनशिल व गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोस्टे. रामनगरचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि. बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि कावळे, ना.पो.शि. संतोष येलपुलवार, पोशि. गोपाल अतकुलवार, नरेश डाहुले, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिल्पे, नापोशि. प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केली असून पुढिल तपास पोलीस स्टेशन, रामनगर हे करीत आहेत.

दिनचर्या न्युज