तेजस्विनी पत संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल करा - मनसे





तेजस्विनी पत संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल करा - मनसे

संस्थेचे एजंट व ठेवीदार यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
वरोरा येथील नर्मदा पेंदोर व दत्ता बोरीकर या पतीपत्नीने वरोरा शहरात तेजस्विनी नागरी सहकारी पत संस्था सन 2014 ला स्थापन केली होती. त्यात वरोरा शहरातील नागरिकांसह ग्रामीण मधे टेमूडी, खांबाडा, माळी, नागरी, शेगांव इत्यादी गावांतील एजंट व ठेवीदार यांच्या माध्यमातून दैनिक ठेव, मासिक, वार्षिक ठेव व फिक्स , डिपॉझिट असे मिळून जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांच्या गुंतवणूकी करण्यात आल्या. जवळपास सन 2017 पर्यंत या संस्थेत जमा झालेले पैसे संस्थेच्या अध्यक्षा नर्मदा पेन्दोर व त्यांचे पती दत्ता बोरीकर यांनी स्वतःकडे संस्थेच्या एजंट व ठेवीदारांना मागील सहा ते सात वर्षापासून झुलवत ठेवले आहे. दरम्यान सन 2019 मधे था संस्थेच्या संचालकांविरोधात पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली पण पोलिसांनी कारवाई केली नाही व आता सुहा दिनांक 28/1/2023, 27/2/2023 व 31/3/2023 ला पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.अशी माहिती श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
मला न्याय न मिळाल्यास आत्महत्या केल्याशिवाय माझ्या कडे कोणत्याही पर्याय नाही. माझ्या आत्महत्येस पोलीस प्रशासन, दत्ता बोरीकर त्यांची पत्नी , हे असतील अशी माहिती नलिनी जोगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

एकीकडे पोलीस संचालकांवर कारवाई करत नाही तर दुसरीकडे संस्थेच्या अध्यक्षा नर्मदा पेन्दोर व तिचे पती जीवे मारण्याच्या धमक्या देऊन एजंट व ठेवीदारांना गप्प करतात एवढेच नव्हे तर नलिनी जोगे या एजंट महिलेल्या दत्ता बोरीकर यांनी जीवे मारण्याची 3 मार्च ला धमकी दिली व तिला मारहाण सुद्धा झाली. या पत संस्थेच्या अध्यक्षा व संचालकांनी कोट्यावधी रुपयांची लूट ठेवीदारांकडून केली जातं असतांना पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या संस्थेचे एजंट व ठेवीदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरीत संचालकांवर ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हे दाखल करून संचालकांची स्थावर मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करावे अन्यथा सर्व एजंट व ठेवीदारांना घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसे विधी कक्ष विभाग जिल्हा अध्यक्षा अॅड मंजू लेडांगे, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शहर अध्यक्ष विजय तुयिल व संस्थेच्या एजंट ठेवीदार ननिनी जोगे. रोहिणी पाटील. प्रिती आत्राम यांनी दिला आहे. यावेळी सुनील चिलबिलवार व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.