मनपात प्रशासन राज, अधिकाऱ्याची मनमर्जी , शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
एक वर्षापासून चंद्रपूर महानगरपालिका येथे प्रशासन राज सुरू झाले. महापौर, वार्डांतील नगरसेवकांची असलेली सत्ता संपुष्टात आल्याने चंद्रपूर शहर अनेक समस्याचे माहेरघर झाले आहे. महानगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या मन मर्जीने सर्व कामे सुरू असून, चंद्रपूर शहराचा समस्याच्या विळख्यात जाणार तर नाही ना अशी भीती नागरिकांना वाटायला लागली आहे. प्रशासन राज असल्याने, वॉर्डाची नगरसेवकांचा प्रशासनावर दबाव नसल्याने
वार्डात साफसफाई पासून, घनकचऱ्याच्या, वार्डात पाण्याची
समस्यापर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आणि कर्मचारी निढर झाले आहेत.
मागील तीन-चार दिवसापासून भिवापूर वार्डातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला नहाक तोंड द्यावा लागत आहे. वार्डात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही सुद्धा त्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित अधिकारी कातोडे यांना वारंवार फोन करून या समस्या बाबत सांगितले असता सुद्धा ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तर वाँलमॅन हा सांग काम्या आहे.
काही दिवसापूर्वीच अवकाळी पावसाने अहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामध्ये अनेक नुकसान झाले. त्याचाच बहना करून पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कधी सप्लाय नाही. तर कधी पाईपलाईन लिकेज झाल्याचा बहाणा करून वार्डात नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा हेतूपरस्पर बहाना करत आहे.
मागील दोन-तीन वर्षापासून चंद्रपूर शहरांमध्ये अमृत योजनेच्या काम सुरू आहे. परंतु ते काम अजूनही पूर्णत्वास न गेल्याने ही योजना धुळखात पडली आहे. करोडो रुपयाची लागत असलेल्या या अमृत योजनेचे तिन -तेरा वाजले की काय? असा प्रश्न आता चंद्रपूरकरांना वाटू लागला आहे. मनपा प्रशासनाकडे आर्थिक नियोजन नसल्याच्या कारण समोर करून अनेक कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याचे आणि चंद्रपूर शहरामध्ये यामुळे समस्या तयार झाल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री या समस्येकडे दुर्लक्ष करून इतर कामात व्यस्त असल्याचे चित्र बघावस मिळत आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून करोडो रुपये खर्च करून शहरात अमृत योजनेची पाईपलाईन पक्के रस्ते फोडून टाकण्यात आली. अजूनही चंद्रपूर शहरातील रस्ते खड्ड्यात असल्याची जान चंद्रपूरकरांना होतं आहे. मनपा मध्ये राजकीय सत्ता असताना जे काम होत होते. ते काम मनपा प्रशासनाकडून होत नसल्याची बोंब चंद्रपूर शहरातील नागरिकाकडून होत आहे. निढर झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर वचक ठेवावे. मनपा आयुक्त यांनी चंद्रपुरात होत असलेल्या समस्याकडे गांभीर्याने घेऊन लक्ष देण्याची गरज आहे.